Pune Crime | शिवसेनेच्या नगरसेवकाकडं मागितली तब्बल 15 लाखाची खंडणी ! माजी उपसरपंच, पत्रकार व 4 महिला कार्यकर्त्यासह 9 जणांवर FIR, ‘रिपोर्टर’सह दोघांना अटक

पुणे / चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खेड तालुक्यातील चाकणमध्ये (Chakan, Khed Taluka) शिवसेनेच्या नगरसेवकाकडे (Shivsena corporator) तब्बल 15 लाखांची खंडणी (ransom) मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माजी उपसरपंच, पत्रकार यांच्यासह 9 जणांविरोधात पुणे ग्रामीणच्या (Pune Crime) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणात पत्रकारासह (Journalist Arrest) त्याच्या साथिदाराला अटक केली आहे. हा प्रकार 4 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत सावतामाळी चौकातील नगरसेवकांच्या कार्यालयात घडला. हा प्रकार समोर येताच चाकणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

माजी उपसरपंच प्रितम शंकरसिंग परदेशी (Pritam Shankarsing Pardeshi), संगिता वानखेडे (sangita wankhede) , कांतीलाल सावता शिंदे (Kantilal savata shinde), गितांजली भस्मे (Gitanjali Bhasme), कल्पेश अनंतराव भोई Kalpesh anantrao bhoi (वय-49), मंदा जोगदंड (manda jogdand), कुणाल राऊत Kunal raut (सर्व रा. चाकण), संगिता नाईकरे sangita naikare (रा. तनिष सोसायटी फ्लॅट नं. सी 901 दिघी), प्रणित (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 41 वर्षीय नगरसेवकांनी सोमवारी (दि.13) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादेवरुन पोलिसांनी पत्रकार कल्पेश अनंतराव भोई (Kalpesh Anantrao Bhoi) आणि कुणाल राऊत यांना सोमवारी रात्री अटक केली आहे. फिर्यादी हे शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. सध्या ते नगरसेवक नाहीत. त्यांचा कार्यकाळ संपला असल्याची माहिती तपास अधिकारी विजय जगदाळे (PSI Vijay Jagdale) यांनी दिली.

Beed Accident News | बीड-परळी मार्गावर 2 जीपची समोरासमोर धडक; दीर-भावजय जागीच ठार

नगरसेवकांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्याच आलेल्या आरोपींनी व इतर सक्रीय टोळीने संगनमत करुन बदनामी करण्याच्या उद्देशाने एका महिलेला चाकण पोलीस ठाण्यात वारंवार पाठवून नगरसेवक यांच्या विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार देण्यास सांगितले होते.

टोळीकडून 15 लाखाची खंडणीची मागणी

दरम्यानच्या काळात हे प्रकरण मिटवण्यासाठी ब्लॅकमेल (Blackmail) करुन सुरुवातीला 15 लाखांची खंडणी मागितली.
त्यानंतर तडजोड करुन 12 लाख किंवा 5 लाख रुपये व तक्रारदार महिलेच्या उपचारासाठी वारंवार पैशांची मागणी केली.
पैशाची मागणी करण्याच्या सर्व घटना नगरसेवक यांच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.
तसेच पैशांची मागणीचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग देखील समोर आले आहे.
नगरसेवकांनी सीसीटीव्ही व व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.

दरम्यान हा प्रकार समोर येताच चाकणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत (Senior Inspector of Police Ashok Rajput) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड (API Prakash Rathod) आणि पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे (PSI Vijay Jagdale) अधिक तपास करीत होते. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. तर अन्य आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हे देखील वाचा

RBI नं दिल्या सर्व बँक ग्राहकांना ‘या’ महत्वाच्या सूचना !

Chandrapur News | फिल्मी लव्ह स्टोरी ! तरुणीनं लग्न झाल्यानंतर 3 महिन्यांनी पतीचं घर सोडून थेट प्रियकराचं घर गाठलं, अन्…

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | 15 lakh ransom demanded from Shiv Sena corporator! FIR against 9 persons including former deputy sarpanch, journalist and 4 women activists, two arrested with reporter Kalpesh Anantrao Bhoi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update