Pune Crime | 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार ! ‘गर्भ’ पाडण्यासाठी जबरदस्तीने ‘पपई’ व दिल्या ‘गोळ्या’; बहिण-भावाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती (pregnant) राहिली असताना तो पाडण्यासाठी जबरदस्तीने पपई (Papaya) व गोळ्या (Tablets) खायला देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) एका 22 वर्षाच्या तरुणावर व त्याला साथ देणार्‍या त्याच्या लहान बहिणीवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

दत्तु बसप्पा पुजारी (वय 22, रा. शांतीनगर वसाहत, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार 1 मार्च 2021 रोजी व नंतर वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षाची मुलगी शौचालयाला जात असताना दत्तु पुजारी याने तिचे तोंड दाबून बाजूला नेले. कमरेच्या पट्ट्याने तिला मारहाण करुन तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केला. त्यानंतर त्याने या मुलीला धमकावून वेळोवेळी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. ही बाब दत्तु याच्या लहान बहिणीला समजल्यावर तिने या मुलीचा गर्भ पाडण्यासाठी (abortion) तिला दोन पपई व कोणत्या तरी गोळ्या खाण्यास दिल्या. ही बाब मुलीच्या आईला समजल्यावर तिने भोसरी पोलिसांकडे (Bhosari Police) फिर्याद दिली आहे.

Web Titel :- Pune Crime | 15 year old girl raped! ‘Papaya’ and ‘pills’ forcibly aborted; Filed a crime against a sibling

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Social Media Posts | सोशल मीडियावरून मिळू शकते घसघशीत पगाराची नोकरी, फक्त पोस्टमध्ये करू नका ‘या’ 5 चूका; जाणून घ्या

Pune Crime | पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरील शॉपमध्ये नोकरी मागण्यासाठी गेली होती 27 वर्षीय महिला, बाळू शिळीमकर म्हणाला – ‘नवऱ्यासोबत जो प्रोग्राम करते तो माझ्यासोबत कर’

Pune Crime | सैन्य भरतीत बनावट जन्मदाखला देऊन बॉम्बे इंजिनियरिंगची फसवणूक; पुण्याच्या विश्रांतवाडीमधील घटना