Pune Crime | 16 वर्षीय मुलानं बापाचा केला खून, खेड तालुक्यातील खळबळजनक घटना

पुणे / राजगुरूनगर पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | येथील खेड (Khed) तालुक्यातील पुर्व भागातील दावडी (Davadi) येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने चक्क वडिलांच्या डोक्यात लोखंडी घण घालून खुन (Murder) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वडील दारू पिऊन शिवीगाळ मारहाण करत असल्याच्या कारणावरुन त्याने वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे दावडी येथील परिसरात खळबळ उडाली आहे. संतोष वाघिरे (वय, 43 रा. कान्हुरकरमळा, चिंचोशी रोड, ता. खेड ) असं खून झालेल्या वडिलांचे नांव आहे. ही घटना मंगळवारी रात्री 11 च्या दरम्यान (Pune Crime) घडलीय. याप्रकरणी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘दावडी (Davadi) गावचे हद्दीत कान्हुरमळा, चिंचोशी रोड, येथे मृत संतोष वाघिरे (Santosh Waghire) आणि त्यांचा 16 वर्षीय लहान मुलगा हे वास्तव्यास होता.
त्यांचा म्हशी पालन आणि दुग्ध व्यवसाय आहे.
संजय वाघिरे हे रोज दाऊ पिऊन अल्पवयीन मुलाला शिवीगाळ मारहाण करून काम करण्यास लावत होते. दरम्यान, 10 ऑगस्ट (मंगळवारी) संजय वाघिरे यांनी आपल्या मुलाला दिवसभर शिवीगाळ आणि मारहाण केलीय.
नंतर जेवायला न देता रात्री गोठयामध्ये झोपायला लावले.
या कारणावरून मुलाला राग आल्याने गोठयातील लोखंडी घणाने वडील संतोष वाघिरे यांच्या डोक्यात घाव घालून खून (Murder) केला आहे.

 

दरम्यान, याप्रकरणी त्या मुलाचा मोठा बंधू आदिनाथ संतोश वाघिरे (Adinath Santosh Waghire), (वय, 20) यांनी लहान भावाच्या विरोधात वडीलाच्या खुनाची फिर्याद दिलीय.
यावरून घटनास्थळी खेड पोलिस ठाण्याचे (Khed police station) पीआय सतीश गुरव,
उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार सचिन गिलबिले यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
याप्रकरणी पुढील तपास एपीआय राहूल लाड (API Rahul Lad) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | 16 year old boy killed his drunken father stabbing him head

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bachchu Kadu | ‘राज, उद्धव यांचं सांगू नका, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो’ – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

EPF दर महिन्याला पैसे जमा केल्यास देते 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त, केवळ करावे लागेल ‘असं’ प्लॅनिंग; जाणून घ्या

Murder in Chakan | हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या रागातून तरुणाचा खून, तर एकावर खुनी हल्ला