Pune Crime | पुण्यात 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Abuse minor girl) करत तीला फोटो व्हायरल (Photo viral) करण्याची धमकी (Threat) दिल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने खडक पोलीस ठाण्यात (Khadak police station) फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपीविरोधात पॉस्को (pocso act) अंतर्गत गुन्हा दाखल (Pune Crime) करुन आरोपीला अटक (Arrest) केली.

वृषभ सुधीर शिंदे (वय-19 रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीने पीडित 16 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केले.
आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्यानंतर पीडित मुलीने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police) धाव घेत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित 16 वर्षीय मुलगी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केले.
यानंतर तिला स्वत:चे नग्न फोटो पाठवण्यास सांगितले.
आरोपीने मुलीचे नग्न फोटो व्हायरल (Nude Photos Viral) करण्याची धमकी देत तिला शिवीगाळ केली. तसेच तिला मारहाण केली.
पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के करत आहेत.

Web Title : Pune Crime | 16 year old girl physically abused in Pune, pocso case filed in khadak police station police arrest one

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Lonikand Police | लोणीकंद पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नातील 3 महिन्यापासून फरार आरोपीला अटक

EPFO | खुशखबर ! 6 कोटी नोकरदारांच्या PF खात्यात येणार पैसे, ‘या’ 4 पद्धतीने तात्काळ तपासा बॅलन्स, जाणून घ्या

ISRO Recruitment 2021 | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या