Pune Crime | पुण्यात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार ! प्रियकर आणि त्याच्या मित्राकडून ‘डर्टी पिक्चर’ व्हायरल; येरवडा पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | त्याने प्रथम तिच्यावर अत्याचार (Rape) केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तिचा गर्भपात केला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करत असताना दुसर्‍याने पाहिले. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. त्याचे तिच्या प्रियकराने चित्रण केले. प्रियकरानेच ते चित्रिकरण मित्रांमध्ये व्हायरल केल्यानंतर आता 16 वर्षाच्या या अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे धाव घेतली. येरवडा पोलिसांनी (Yerwada Police Station) तिच्या प्रियकरासह दोघांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

आमित अबदेश यादव (वय 18, रा. वडगाव शेरी) आणि धनंजय नामदेव रोकडे (वय 38, रा. वडगाव शेरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, या तरुणीचे आणि आमित यादव यांचे 2019 पासून प्रेमसंबंध होते. त्यात त्यांच्यात शारीरीक संबंध आले. त्यातून ही तरुणी गर्भवती राहिली. तेव्हा तिला गर्भपात करावा लागला. आमित यादव हा या तरुणीला घेऊन वडगावशेरी (Wadgaon Sheri) येथील एका अर्धवट बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये 4 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घेऊन गेला.

 

त्याच्यात शारिरीक संबंध सुरु असताना तेथे धनंजय रोकडे आला.
त्याने दोघांचे संबंध होत असताना मोबाईलवर शुटिंग (Pune Crime) केले.
ही शुटींग व्हायरल करण्याची धमकी देऊन रोकडे याने या तरुणीवर बलात्कार केला.
त्याचे आमित यादव याने व्हिडिओ शुटींग केले.
त्यानंतर यादव याने हे रेकॉर्डिंग आपल्या मित्रांमध्ये व्हायरल केले.
याची माहिती सर्वत्र झाल्यानंतर बदनामी झाल्याने या तरुणीने दोघांविरुद्ध (Pune Crime) फिर्याद दिली आहे.
येरवडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | 16 year old girl raped in Pune ! Dirty picture viral from boyfriend and his friend; Yerawada police arrest two

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा