Pune Crime | पुण्यात सावत्र बापच बनला नराधम ! 16 वर्षाच्या मुलीला धमकावून केला वारंवार बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ११ वर्षाच्या मुलीवर बाप, भाऊ, आजोबा, चुलत मामा यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असताना आता सावत्र बापच नराधम बनल्याचे प्रकरण समोर आले आहे. सावत्र बापानेच गेल्या ४ वर्षापासून १६ वर्षाच्या मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape In Pune) केल्याचा निष्पन्न झाले आहे. (Pune Crime)

 

ही घटना वडगाव शेरी (Wadgaon Sheri) व वाघोली (Wagholi) येथील दोन सोसायटींमध्ये २०१६ ते २०१८ दरम्यान आणि २०१९ ते २०२० दरम्यान घडली आहे.

 

याप्रकरणी एका १६ वर्षाच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी यांच्या ३२ वर्षाच्या सावत्र बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी मुलीचा सावत्र बाप आहे. फिर्यादी मुलगी घरात एकटी असताना त्याने मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. वडगाव शेरी आणि वाघोली येथील सोसायटीमध्ये रहात असताना हा प्रकार होत होता. दरम्यान हा सावत्र बाप आसामला निघून गेल्यानंतर आता मुलीने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला (Pune Crime). त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. येरवडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | 16 year old girl threatened and repeatedly raped by step father in wadgaon sheri wagholi area of pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा