Pune Crime | अनैतिक संबंधातून 17 वर्षाच्या मुलीने दिला मुलाला जन्म; 20 वर्षीय बाप आला ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एक वर्षापासून सुरु असलेल्या अनैतिक संबंधातून एका 17 वर्षाच्या मुलीने मुलाला जन्म दिला असून सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) एका तरुणाला अटक (Pune Crime) केली आहे.

अनिरुद्ध समाधान आगलावे Aniruddha Samadhan Aaglave (वय 20, रा. वडगाव बुद्रुक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 17 वर्षाची मुलगी आणि आरोपी यांचे एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मुलीची इच्छा नसताना तिचे सोबत बळजबरीने शरीरसंबंध केले. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली होती. तिने नुकताच एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर फिर्यादी यांनी डॉक्टरांकडे जाऊन माहिती घेतली. मुलीला विश्वासात (Pune Crime) घेऊन चर्चा केल्यानंतर फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 376 सह पोक्सो अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

Web Titel :- Pune Crime | 17-year-old girl gives birth to child through immoral relationship, 20 years youth arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

DGP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, 4 डीसीपी, काही एसीपींसह 25 पोलिस अधिकारी ‘गोत्यात’, निलंबनाच्या हालचालींना वेग; जाणून घ्या प्रकरण

PM-Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांना 10 व्या हप्त्यात 2000 ऐवजी मिळू शकतात 4000 रुपये, तात्काळ जमा करा हे कागदपत्र, जाणून घ्या

Anti Corruption | 12 लाखाचं लाच प्रकरण ! 2 लाखाची लाच घेताना गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलमधील अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, पोलिस दलात खळबळ