Pune Crime | पुण्यात सराईत गुन्हेगाराकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, उत्तमनगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विवाहित असताना ते लपवून अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण करुन एका सराईत गुन्हेगाराने तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police Station) दादु कॉलविन (वय ३०, रा. मासेआळी, उत्तमनगर) याच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा (POCSO Act) दाखल केला आहे. याप्रकणी उत्तमनगरमधील एका १७ वर्षाच्या युवतीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१९ ते १ डिसेबर २०२१ दरम्यान घडला आहे.

दादु कॉलविन हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने फिर्यादीचा पाठलाग करुन तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले.
तिची इच्छा नसताना बळजबरीने तिच्याशी शरीरसंबंध निर्माण केले. तो विवाहित आहे, हे फिर्यादीपासून लपवून ठेवले.
फिर्यादी हिला तो विवाहित असल्याचे समजल्यावर तिने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने फिर्यादी व तिच्या आईला शिवीगाळ करुन मारहाण (Pune Crime) केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 17 year old girl raped by a criminal in Pune, incident in Uttamnagar area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Indrani Balan Foundation | ‘आयसर’मध्ये इंद्राणी बालन सायन्स ॲक्टिविटी सेंटरच्या उभारणीसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनकडून 23 कोटी रुपयांची देणगी

Pune Crime | कोंढव्यातील मंगेश माने टोळीवर ‘मोक्का’ ! पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 62 वी MCOCA कारवाई

Gold Silver Price Today | महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार, नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये

Pune News | बांग्लादेश युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळविलेल्या विजयाच्या 50 व्या वर्षानिमित्त ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे आयोजन – आबा बागुल

Pune Crime | राज्यस्तरीय खेळाडूच्या बनावट प्रमाणपत्रांवर बनला सहायक पोलीस उपनिरीक्षक, पर्दाफाश झाल्यानंतर पुण्यात FIR

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन