Pune Crime | पुण्यातील नांदेड सिटीमध्ये नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या 17 वर्षीय श्रीया पुरंदरेची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इयत्ता बारावीत शिकणाऱ्या एका तरुणीने आज (रविवार) सकाळी आत्महत्या केली. आत्महत्या करणारी तरुणी ही एक नॅशनल हॉर्स रायडर (National Horse Rider) होती. ही घटना पुण्यातील (Pune Crime) नांदेड सिटी (Nanded City) येथे घडली आहे. श्रीया गुणेश पुरंदरे Shreeya Gunesh Purandare (वय-17 रा. डी.1103, मधुवंती, नांदेड सिटी, नांदेड, ता. हवेली) असे आत्महत्या (commits suicide) करणाऱ्या मुलीचे नाव आहे. तिने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या (Pune Crime) केली.

श्रीया पुरंदरे हिच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास गॅलरीत व्यायाम करणारे अभिजीत देशमुख (Abhijeet Deshmukh) यांना काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला. त्यांनी खाली पाहिले असता त्यांच्या मुलीच्या वर्गात शिकणारी श्रीया पडली असल्याचे त्यांना दिसले. अभिजीत यांनी तातडीने ही महिती हवेली पोलीस ठाण्याला (Haveli police station) दिली. श्रीया ही नॅशनल हॉर्स रायडर (National Horse Rider) होती.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीया ही अत्यंत हुशार मुलगी होती. तसेच तिच्या घरातील वातावरणही
खेळीमेळीचे होते. श्रीयाच्या वडीलांची हॉर्स रायडींग अ‍ॅकॅडमी (Horse Riding Academy) आहे. त्यामध्ये लहानपणापासून ती हॉर्स रायडींगचे धडे घेत होती. राज्य व राष्ट्रीय पातळीवर श्रीयाने हॉर्स रायडींग मध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार (Police Inspector Sadashiv Shelar) यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रेयाने अचानक टोकाचे पाऊल का उचलले याबाबत हवेली पोलीस तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Nagpur News | नागपुर संघ मुख्यालयाजवळ भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले

ICICI Bank ने आजपासून केला मोठा बदल, ग्राहकांना खर्च करावे लागतील जास्त पैसे; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | 17-year-old National Horse Rider Shreeya Gunesh Purandare commits suicide in Nanded City, Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update