Pune Crime | 531 गुंतवणुकदारांची 17 कोटीची फसवणूक ! गुडवीन ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालकाचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे : Pune Crime | स्कीम, भिशी आणि ठेवींमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक परतावा अथवा सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून ५३१ गुंतवणुकदारांची तब्बल १६ कोटी ९३ लाख ७८ हजार ६०१ रूपयांची फसवणूक (Pune Crime) केल्याप्रकरणात गुडवीन ज्वेलर्सच्या (godwin jewelers) व्यवस्थापकीय संचालकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला (Bail Refused) .

विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी (Special Judge S. S. Gosavi) यांनी बुधवारी हा आदेश दिला. सुनीलकुमार मोहन अक्कारकरन (Sunilkumar Mohan Akkarakaran) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. पिंपरीमधील ६४ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार निगडी पोलीस ठाण्यात(Nigdi Police) गुडविन ज्वेलर्सचे सुनीलकुमार अक्कारकरन आणि संचालक सुधीरकुमार मोहनन अक्कारकारन आणि व्यवस्थापक रवि के नायर आणि सेतू पनीकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुनीलकुमार आणि सुधीरकुमार मोहनन अक्कारकारन यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांची तीन लाख रूपये तर फिर्यादीसह इतर गुंतवणुकदारांची रक्कम ही ३ कोटी ४ लाख ४३ हजार ८८० रूपये इतकी आहे. तपासादरम्यान, आरोपींनी ५३१ गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. एकूण रक्कम १६ कोटी ९३ लाख ७८ हजार ६०१ रुपये आहे. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर सुनीलकुमार याने जामीनासाठी अर्ज केला होता. आरोपीला जामीनावर सोडल्यास यातील साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता आहे तसेच केरळमध्ये जाऊन स्थावर व जंगम मालमत्ता तो नातेवाईकांच्या नावे वळती करण्याची शक्यता आहे, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील सुनील हांडे (Special Public Prosecutor Sunil Hande) यांनी केला. न्यायालयाने तो मान्य करीत आरोपीचा जामीन फेटाळला.

हे देखील वाचा

WhatsApp चं नवं फीचर ! यूजर्सला नवीन मेसेज मिळाल्यानंतर सुद्धा Archived Chats कडून मिळणार नाही नोटिफिकेशन

IMD Alert | पुढील काही तासात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | 171 crore fraud of 531 investors! The bail application of the managing director of Godwin Jewelers was rejected

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update