Pune Crime | सीटी स्कॅन मशीन देण्याच्या आमिषाने डॉक्टरांना 18 लाखांना गंडा

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | शिरुर येथील हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन मशीन बसवून देण्याच्या आमिषाने डॉक्टरांना तब्बल 18 लाख 20 हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.

याप्रकरणी डॉ. अमोल आबासाहेब खोडदे (वय ३४, रा. विठ्ठलनगर, शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार पोलिसांनी पवन कुमार (Pawan Kumar) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार मार्च 2021 पासून आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अमोल खोडदे यांचे शिरुरमध्ये वरद डायग्नोस्टीक सेंटर हे हॉस्पिटल आहे. या ठिकाणी त्यांना सीटी स्कॅन मशीन बसवायचे होते.
पवन कुमार याने त्यांना मशीन बसवून देण्याचे आश्वासन दिले.
त्यांच्याकडून आरटीजीएस व रोख स्वरुपात 18 लाख 20 हजार रुपये घेतले.
परंतु, मशीन बसवून दिले नाही. तसेच पैसेही परत केले नाही.
शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक खानापुरे तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | 18 lakh to doctors for lure of CT scan machine

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | सायबर चोरट्यांनी Lombard जनरल इन्शुरन्स कंपनीला केले ‘टार्गेट’; कंपनीतून बोलत असल्याचे सांगून देशभरात अनेकांची केली फसवणूक

Delta Variant | लसीकरणाने तयार होणार्‍या अँटीबाडी समोर निष्प्रभ होतो कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, शास्त्रज्ञांचा दावा

Pension | आता एकाच व्यक्तीला मिळू शकतो दोन पेन्शनचा लाभ, जारी झाले नवीन नियम; जाणून घ्या