Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरामध्ये कोणी नसताना जबरदस्तीने घरात घुसून एका 18 वर्षाच्या तरुणीला मारहाण (Beating) करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीतील फूरसूंगी (Fursungi) येथे घडली आहे. पोलिसांनी (Pune Police) तेजस सुनिल हरपळे (Tejas Sunil Harpale) याच्यावर आयपीसी IPC 354, 354 ड, 452, 323, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला (Pune Crime) आहे.

याबाबत फूरसूंगी परिसरात राहणाऱ्या एका 18 वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तेजस हरपळे (वय-25 रा. फूरसूंगी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) सकाळी 11 च्या सुमारास घडला. आरोपीने यापूर्वी देखील पीडित तरुणीच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली होती. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास घरात कोणी नसताना आरोपी जबरदस्तीने घरात घुसला. त्याने पीडीत तरुणीला ‘तु मला खूप आवडतेस आपण पळून जाऊन लग्न करु’ असे म्हणाला. फिर्यादीने याला नकार दिला असता त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्याला विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण केली. आरोपीने यापूर्वी देखील फिर्यादी त्याच्या सोबत बोलत नसल्याच्या रागातून तिच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | 18-year-old girl molestation case, incident in Fursungi area
of ​​Hadapsar police FIR against Tejas Sunil Harpale

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा