Pune Crime | पुण्यात फळांची वाहतूक करणार्या ट्रकमधून 3.75 कोटी रुपये किंमतीचा 1878 किलो गांजा जप्त; महसूल गुप्तचर संचालनालयाकडून 6 जणांना अटक

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – अननस आणि जॅकफ्रूट फळांची वाहतूक करणार्या ट्रकमध्ये खाली लपवून आणलेला गांजा महसूल गुप्तचर संचालनालय (Directorate of Revenue Intelligence) च्या पुणे प्रादेशिक युनिटने (Pune Crime) जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 3 कोटी 75 लाख रुपये किंमतीचा 1 हजार 878 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 15) पुणे-सोलापूर महार्गावर (Pune-Solapur Highway) करण्यात आली. या कारवाईमध्ये महाराष्ट्र (Maharashtra) आणि तेलंगणा (Telangana) येथील 6 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. पुणे युनिटने ही कारवाई (Pune Crime) केल्याने गुन्हेगारांचे आणि अंमली पदार्थांची तस्करी करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
महसूल गुप्तचर संचालनालय पुणे युनिटचा पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur highway) आयशर ट्रक (टीएस 07 युए 7979) आणि एक कार
(आरटीओ पासिंग नं. TS09 EP T/R 90) ही दोन संशयित वाहने आडवली.
आयशर ट्रकची तपासणी केली असता टेम्पोमध्ये अननस आण जॅकफ्रूट होते.
या फळांच्या खाली 40 पिशव्यांमध्ये गांजा लपवल्याचे आढळून आले.
अधिकाऱ्यांनी गांजा जप्त करुन आयशर टेम्पो मधील 2 आणि कारमधील 4 अशा एकूण 6 आरोपींना अटक केली.
विलास पवार, अभिषेक घावटे, विनोद राठोड, राजू गोंधवे, श्रीनिवास पवार आणि धरमराज शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींकडे केलेल्या चौकशीत हा गांजा आंध्र प्रदेशातून आणण्यात आला असल्याची कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर एनडीपीएस अॅक्ट 1985 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title : Pune Crime | 1878 kg of cannabis worth Rs 3.75 crore seized from a truck transporting fruits in Pune; 6 arrested by Revenue Intelligence Directorate
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pimpri Crime | पिंपरी चिंचवड पोलिसांकडून दोन टोळ्यांवर ‘मोक्का’ कारवाई
Pune Corporation | पुणे महापालिकेत पुन्हा भाजप आणि RPI ची सत्ता येणार; रामदास आठवलेंचा विश्वास
Viral Video | हुबेहुब आपल्या वडिलांसारखी गोलंदाजी करतो मुरलीधरनचा मुलगा, व्हिडिओ झाला व्हायरल