Pune Crime | मोक्का गुन्ह्यातील आरोपी तुषार हंबीर याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मोक्का (MCOCA) Mokka गुन्ह्यात येरवडा कारागृहात (Yerawada Jail) असलेल्या सराईत गुन्हेगार तुषार हंबीर (Tushar Hambir) याला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना 5 सप्टेंबर रोजी हल्ला (Attack) करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार दोन मुख्य आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचच्या (Crime Branch Unit 5) पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.17) उत्तमनगर मधील भिमनगर (Pune Crime) येथे करण्यात आली.

 

सराईत गुन्हेगार तुषार हंबीर (वय-35 रा. गोंधळेनगर, हडपसर) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रकाश दिवाकर, सागर ओव्हाळ, बालाजी ओव्हाळ, नोन्या उर्फ प्रतीक कांबळे, ऋतिक उर्फ बबलु राजु गायकवाड, साहिल इनामदार यांच्यावर आयपीसी 307, 353, 332, 120(ब), 141, 143, 144, 147, 148, 149, आर्म अ‍ॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट (Maharashtra Police Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. (Pune Crime)

 

गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी मुख्य सुत्रधार प्रतिक उर्फ नोन्या आणि त्याचा साथीदार ऋतिक उर्फ बबलु याला यापूर्वी अटक केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रकाश उर्फ वैष्णव रणछोडदास दिवाकर (वय-26 रा. भिमनगर, उत्तमनगर) आणि परवेज उर्फ साहिल हैदरअली इनामदार (वय-21 रा. उरुळी देवाची) हे भिमनगर उत्तमनगर (Uttamnagar) येथे आल्याची माहिती पथकातील पोलिसांना पेट्रोलींग दरम्यान मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil),
सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar), पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड,
प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अकबर शेख, दयाराम शेगर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | 2 accused who attacked Mokka crime accused Tushar Hambir in Sassoon Hospital arrested by Pune Police Crime Branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

आता घरबसल्या पेन्शनर्स जमा करू शकतात Digital Life Certificate, EPFO ने लाँच केले अ‍ॅप, जाणून घ्या प्रक्रिया

30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा Demat Account संबंधित हे महत्वाचे काम, अन्यथा करू शकणार नाही शेअरची खरेदी-विक्री

MP Vinayak Raut | एकनाथ शिंदेवर टीका करताना विनायक राऊत यांची जीभ घसरली, म्हणाले…