Pune Crime | पुण्यात गांजा, MD, LSD सह दोन जणांना अटक, गुन्हे शाखेकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात (Pune Crime) अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक दोनच्या (anti narcotics cell) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ओझे कुश (हायब्रीड) गांजा (Marijuana), मेफेड्रॉन (MD) तसेच एलएसडी (LSD) अंमली पदार्थ जप्त केला आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई मंगळवारी (दि.23) रात्री 11 च्या सुमारास पुण्यातील (Pune Crime) विद्यानिकेतन शाळेजवळ (Vidyaniketan School) असलेल्या सार्वजनिक रोडवर केली. या कारवाईत 8 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

कुंदन गौतम कोकाटे Kundan Gautam Kokate (वय-23 रा. ट्रांझीस्ट कॅम्प, ए विंग म्हाडा कॉलनी, नवघर पोलीस स्टेशन समोर, मुलुंड, मुंबई), तपन जितेंद्र पंडित Tapan Jitendra Pandit (वय-34 रा. साईकृपा सोसायटी, धनकवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी परिमंडळ 4 व 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मयुर सुर्यवंशी (Mayur Suryavanshi) यांना माहिती मिळाली की, विद्या निकेतन शाळेजवळील सार्वजनिक रोडवर गोल्डन इनोव्हा कार Golden Innova car (एमएच 04 सीएम 1944) मध्ये दोन व्यक्ती असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी (Pune Crime) सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता 1 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचे एलएसडी, एमडी, ओझीकुश (हायब्रीड) इंडिगो डॉमीनंट फ्लेव्हर गांजा असा अमली पदाथ आढळून आला. पोलिसांनी इनोव्हा कार, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा व दोन मोबाईल असा एकूण 6 लाख 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi police station) एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार (NDPS Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायलयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) मिळाली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर (Police Inspector Prakash Khandekar),
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी,
मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, संतोष जाचक, संदिप शेळके, साहिल शेख, महेश साळुंखे, आझीम शेख,
नितीन जगदाळे, युवराज कांबळे, योगेश मांढरे, दिनेश बास्टेवाड, महिला अंमलदार दिशा खेवलकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | 2 arrested with cannabis, MD, LSD in Pune, Rs 8 lakh seized from pune police crime branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात तिसर्‍या लाटेचा धोका ! घाबरु नका, पण काळजी घ्या; राजेश टोपे म्हणाले…

Earn Money | ‘या’ सरकारी योजनेत केवळ 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी

WBBL | टीम इंडियाच्या कॅप्टनची ऐतिहासिक कामगिरी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिला