Pune Crime | बनावट कागदपत्रांच्या आधारे फायनान्स कंपनीला 2 कोटींचा गंडा, मॅनेजरवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कर्जदारांसोबत संगनमत करुन कागदपत्रांमध्ये फेरफार करुन फायनान्स कंपनीची (finance company) 2 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या मॅनेजर (Manager) विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 नोव्हेंबर 2019 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कात्रज येथील विजेस होल्डिंग्स अँड फायनान्स लि. या कंपनीत घडला आहे.

 

सचिन तुळशीराम बोरसे Sachin Tulshiram Borse (वय-31 रा. शारदा कॅम्प्लेक्स, घुले नगर, मांजरी बु. हडपसर) याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इम्तियाज जैनुलबीन रफाई Imtiaz Zainulbeen Rafai (वय-36 रा. दापोडी, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कात्रज (Katraj) येथील विजेस होल्डिंग्स अँड फायनान्स कंपनीत सचिन बोरसे हा मॅनेजर म्हणून काम करत होता. मॅनेजर पदावर काम करत असताना आरोपीने कर्जरांसोबत संगनमत केले. कर्जदारांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट बनावट (Fake bank statement) व त्यामध्ये फेरफार करुन ती खरी असल्याचे भासवले. या कागदपत्रांच्या आधारे स्वत:च्या फायद्यासाठी कर्जदारांना कर्ज मंजूर करुन फायनान्स कंपनीची 2 कोटी 16 लाखांची फसवणूक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 2 crore cheating case finance company on the basis of forged documents, FIR against manager

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

अडचणीच्या काळात उपयोगी पडतो Emergency Fund, जाणून घ्या किती आणि कसा तयार करावा

Numerology | ‘या’ मूलांकाच्या मुली बनतात चांगली पत्नी, बदलू शकते पतीचे ‘नशीब’; जाणून घ्या

Pune Crime | …म्हणून पुण्यातील एका विवाहितेने खाल्ल्या ‘थायरॉईड’च्या तब्बल 50 गोळ्या

Priyanka Chaturvedi | शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा ! उपराष्ट्रपतींना पत्र लिहून व्यक्त केली खंत; सांसद टीव्हीचे अँकरपद सोडले

Pune Crime | पोलीस चौकीतील खुर्च्या फेकून देत पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण, पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Blind Men’s Association | ‘पुणे अंध जन मंडला’चा ‘पुणे प्रार्थना समाज – डेव्हिड रॉबर्ट्स पुरस्कार 2021’ने गौरव

Women Safety Hub | अश्लिल फोटो व्हायरल करणाऱ्यांना झटका, महिलांच्या सुरक्षेसाठी Facebook ने आणलं ‘हे’ नवं फिचर