Pune Crime | सेल्स मॅनेजरनेच घातला पावणे 2 कोटींना गंडा, बनावट कर्ज प्रकरणे करुन केली फसवणुक; खडकीमध्ये FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नॉन बँकिंग फायनान्स कंपनीत (Non Banking Finance Company) सेल्स मॅनेजर (Sales Manager) असलेल्याने इतरांच्या मदतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे ७ कर्ज प्रकरणे करुन कंपनीची तब्बल १ कोटी ८२ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून सुमित भाऊ कांबळे Sumit Bhau Kamble (वय ३६, रा. येरवडा – Yerwada) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३२/२२) दिली आहे. त्यानुसार महेश धोंडीराम टोंगळे Mahesh Dhondiram Tongle (वय ३१, रा. नेहरुननगर, पिंपरी Nehru Nagar Pimpri) व त्याच्या साथीदारांवर गुन्हा (Fraud Case) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून २०२० ते १९ मे २०२२ दरम्यान घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश टोंगळे हा नॉन बॅकिंग फायनान्स कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता.
त्याने बनावट कागदपत्रांच्या (Loan On Fake Documents) आधारे ५ कर्जदारांचे नावे ७ कर्ज प्रकरणे सादर करुन कंपनीकडून १ कोटी ८२ लाख ७ हजार ८८ रुपयांची कर्ज मंजूर करुन घेतली.
तपासणीमध्ये ही बनावट कर्ज (Fake Loan) प्रकरणे असल्याचे लक्षात आल्यानंतर आता कंपनीच्या वतीने फसवणुकीची फिर्याद देण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक साळवी तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | 2 crores to be worn by the sales manager Fraud by fake loan cases FIR in Khadki

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा