Pune Crime | पिंकी परीयालकडून 2 सोन्याचे बिस्कीट जप्त; जाणून घ्या प्रकरण

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  ज्येष्ठ महिलेला प्रासादातून गुंगीचे औषध देऊन तिची सोनसाखळी चोरल्या प्रकरणी अटक (Pune Crime) केलेल्या महिलेच्या गुजरात येथील घरातून फरासखाना पोलिसांनी 75 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट (gold biscuit) जप्त (Pune Crime) केले आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी तिच्या पोलिस कोठडीत 4 दिवस वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

पिंकी परीयाल Pinky Pariyal (वय 34, मूळ रा. जमशेदपूर, झारखंड, सध्या रा. गुजरात) असे महिला आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. 25 जून 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता स्वारगेट बसस्थानक परिसरात ही घटना घडली.
पिंकीने फिर्यादीना महिना 2 हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून रिक्षाने स्वारगेट भागात नेले. त्यानंतर फिर्यादींना प्रसादातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची साखळी व साडेसहाशे रुपये चोरले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फरासखाना पोलिस (faraskhana police) विभागाचे सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर (assistant commissioner of police satish govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलिस ठाण्याचे (faraskhana police station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे (senior police inspector rajendra landge) आणि त्यांच्या पथकाने पिंकी परियाल (Pinky Pariyal) हिला अटक केली होती.

या प्रकरणी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पिंकीला पुन्हा न्यायालयात हजर केले असता,
पोलिस कोठडी दरम्यान तिच्याकडे केलेल्या तपासादरम्यान पेढ्यातुन गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून 25 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ वितळून त्याचे बिस्कीट केल्याचे सांगितले.
तिच्या गुजरात येथील घरातून 21 ग्रॅम आणि 54 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे बिस्कीट
(gold biscuit) जप्त करण्यात आले आहे.

Web Title : Pune Crime | 2 gold biscuits seized from Pinky Pariyal; Learn the case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

Lonikand Police | लोणीकंद पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नातील 3 महिन्यापासून फरार आरोपीला अटक

EPFO | खुशखबर ! 6 कोटी नोकरदारांच्या PF खात्यात येणार पैसे, ‘या’ 4 पद्धतीने तात्काळ तपासा बॅलन्स, जाणून घ्या