Pune Crime | पुणे शहरातील 2 अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध ! आतापर्यंत MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 41 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरातील (Pune Crime) वारजे माळवाडी आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दित दहशत पसरवणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 41 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली आहे. त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीतील शेखर रविंद्र खवळे (वय-20 रा. बापुजी बुवा चौक, रामनगर, वारजे) आणि
खडक पोलीस ठाण्याच्या (Khadak police station) हद्दीतील सराईत गुन्हेगार अरबाज उर्फ बबन इक्बाल शेख (वय-23 रा. 386 भवानी पेठ, चुडामन तालीम समोर, पुणे)
अशी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांची (Pune Crime) नावे आहेत.

शेखर खवळे (Shekhar Khawale) हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह वारजे माळवाडी परिसरात कोयता, लाकडी बांबू यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न,
दरोडा, दंगा, गंभीर दुखापत, यासारखे गुन्हे केले आहेत.
मागील पाच वर्षात त्याच्यावर 8 गंभीर गुन्हे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके (Senior Police Inspector Shankar Khatke) यांनी आरोपी शेखर खवळे याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला होता.

 

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार बबन शेख (Baban Sheikh) आणि याने त्याच्या साथिदारांसह खडक, लष्कर (Lashkar police station),
समर्थ पोलीस ठाण्याच्या (Samarth Police Station) हद्दीत गुन्हे केले आहेत.
आरोपी शेख कोयता, चॉपर, लाकडी बांबू यासारख्या हत्यारांसह परिसरात फिरत असताना त्याने खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, दुखापत, चोरी, दंगा,
घरफोडी या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 13 गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बिहरट (Senior Police Inspector Shrihari Biharat) यांनी शेख याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना दिला होता.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन दोन्ही गुन्हेगारांवर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची करावाई करण्याचे आदेश दिले.
पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 41 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार
असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title : Pune Crime | 2 hardened criminals located in Pune city for one year! So far, Police Commissioner Amitabh Gupta has taken action against 41 people under the MPDA Act

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

High Court | रवी राणांविरोधातील कारवाईचे काय झाले? उच्च न्यायालयाकडून EC कडे विचारणा

Heart Attack | ‘या’ 10 कारणांमुळे अचानक येऊ शकतो हार्ट अटॅक, कॉफी-सेक्स आणि मायग्रेनपासून सुद्धा रहा सावध

Pravin Darekar | ‘माझ्याकडे बोट दाखवून संधी दिलीय, आता पुण्यासह इतर जिल्हा बँकेचे घोटाळे काढणार’ – प्रवीण दरेकर (व्हिडीओ)