Pune Crime | खून करुन फरार झालेले 2 अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) कर्वेनगरमध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून (Murder) केल्याची घटना रविवारी (दि.26) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल राजेंद्र जाधव Anil Rajendra Jadhav (वय-20 रा. कोथरुड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यातील (Pune Crime) फरार झालेल्या दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने (Anti extortion Cell) ताब्यात घेतले आहे.

रविवारी सायंकाळी अनिल जाधव याचा खुन केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलीस आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस नाईक राजेंद्र लांडगे (Rajendra Landage) यांना अनिल जाधव याचा खून अल्पवयीन मुलांनी केला असल्याची माहिती मिळाली. तसेच ते दोघे कोथरूड येथील चांदणी चौक (Chandni Chowk Kothrud) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Pune Crime)

या कारणामुळे केला खून

ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांकडे चौकशी केली असता, मयत अनिल जाधव हा मावळे आळीतील त्याच्या घराजवळील रस्त्यावरुन येता-जाता शिवीगाळ करुन मारहाण (Beating) करत होता. तसेच तो सिगारेट आणि पेट्रोलसाठी जबरदस्तीने पैसे मागत होता. पैसे दिले नाहीतर मारहाण करत होता. याशिवाय दोन महिन्यापूर्वी अनिल जाधव आणि त्याच्या साथिदारांनी मारहाण केली होती. याच रागातून कर्वेनगर (Karvenagar) येथील बंगला क्रमांक 85 समोरील सार्वजनिक रस्त्यावर अनिलवर कोयता आणि तलवारीने वार करुन खून केल्याची कबुली दिली. आरोपींना पुढील तपासासाठी अलंकार पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा (API Sandeep Buwa), पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, प्रफुल्ल चव्हाण व विजय कांबळे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | 2 juvenile offenders arrested for anil jadhav murder case of karve nagar pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Tukaram Supe | ‘मन:स्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते’ – तुकाराम सुपे