Pune Crime | कोंढवा परिसरातून 2 किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शहरातील कोंढवा भागात (Kondhwa) अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एकास गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अमली पदार्थ विरोधी पथकाकडून (Anti Narcotics Cell , Pune Police) अटक (Arrested) करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन किलो 832 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आले आहे. निजामुद्दीन शहाबुद्दीन खान (Nizamuddin Shahabuddin Khan) (वय 36, रा. भागोदयनगर, कोंढवा) याला अटक करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

याबाबत माहिती अशी की, कोंढवा भागामध्ये निजामुद्दीन खान अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनिय माहिती गस्त घालणाऱ्या अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार, पोलिस पथकाने सापळा रचला आणि खानला ताब्यात घेतले. त्याच्याकडे झडती घेतली असता त्याच्याजवळ असणा-या पिशवीत 2 किलो 832 ग्रॅम गांजा आढळून आला. गांजाची किंमत 56 हजार 640 रुपये आहे. हा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. (Pune Crime)

 

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shrinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior Police Inspector Vinayak Gaikwad), सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale), विशाल दळवी ( Police Vishal Dalvi), संदीप जाधव (Police Sandeep Jadhav), रेहाना शेख (Lady Police Rehana Shaikh) यांनी केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | 2 kg cannabis seized from Kondhwa area

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा