Pune Crime | लिलाव भिशीच्या नावाखाली दोन लाखांची फसवणूक; वानवडी भागातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लिलाव भिशी सुरू करून त्यामध्ये कमिशन म्हणून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातील वानवडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी भिशीचालकावर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै 2017 ते मे 2019 या कालावधीत घडला आहे.

याबाबत दत्तू तिमन्ना तमनगोळ (वय 52, रा. शिवरकर गार्डन, वानवडी गाव, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 5) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दशऱथ महादेव मोरे-पाटील (वय 39, रा. साडेसतरानळी रोड, हडपसर) याच्यावर आयपीसी 420, 465, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दशरथ मोरे याने जुलै 2017 ते मे 2019 या कालावधीत दरमहा
दहा रुपयांची 24 नंबरची लिलाव भिशी सुरू केली होती.
या भिशीत फिर्यादी आरोपीला रोख स्वरूपात 2 लाख 40 हजार रुपये दिले होते. आरोपीने दादासाहेब श्रीरंग माने-देशमुख यांच्यामार्फत फिर्यादी यांना 40 हजार रुपये परत केले. मात्र, या भिशीमध्ये कमिशन म्हणून बोलीच्या वरील रक्कम फिर्यादी यांना न देता दोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत फिर्यादी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी करून दशरथ मोरे याच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | 2 lakh fraud under the pretense of auction; incident in Wanwadi area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

Mumbai High Court On Abortion | मुंबई उच्च न्यायालयाने दिली सशर्त गर्भपाताची परवानगी