पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण (Kidnapping Case) करणार्या कुख्यात गुंड गज्या मारणेच्या (Gajanan Marne) मुसक्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 नं (Anti Extortion Cell) आवळल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Police Crime Branch) त्याला सातारा जिल्हयातील वाईमधून (Wai Satara District) ताब्यात घेतले. गज्या मारणे याला आज (सोमवार) विशेष मोक्का न्यायालयात (Special Court of MCOCA) हजर केले असता न्यायाधीश नावंदर (Judge Navander) यांनी 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती गज्या मारणेचे वकील अॅड. विजयसिंह ठोंबरे (Advocate Adv. Vijay Singh Thombre) यांनी दिली. (Pune Crime)
गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी
खंडणी प्रकरणात सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (वय ४३, रा. धनकवडी), हेमंतऊर्फ आण्णा बालाजी पाटील (वय३९,रा. बुरली, ता. पलूस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६, रा. कोडोवली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय ५०, रा. समर्थ नगर,कोडोवली, जि.सातारा), डॉ. प्रकाश साताप्पा बांदीवडेकर (वय-56 रा. चंदगड, जि. कोल्हापूर), अजय बबन गोळे (वय-28 रा. मानाजी नगर, नऱ्हे), मयुर राजेंद्र निवंगुणे (वय-24 रा. नवले ब्रीज, नऱ्हे), प्रसाद बापू खंडाळे (वय-29 रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) , गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) (टोळीप्रमुख), मयुर जगदिश जगदाळे (वय-31 रा. होळकर नगर, आंबेगाव पठार) रुपेश कृष्णाराव मारणे (रा.कोथरुड), संतोष शेलार (रा.कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दोपोडी), अजय गोळे (रा.नर्हे), नितीन पगारे (रा.सातारा), प्रसाद खंडागळे (रा.तळजाई पठार, सहकारनगर), नवघणे यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime)
काय आहे प्रकरण?
गुंड गजानन मारणे याने सांगली व पुण्यात शेअर व्यवसाय करणार्या एका व्यावसायिकाचे वसुलीसाठी 7 ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास कात्रज येथील आयसीआयसीआय बँक येथून अपहरण केले होते. त्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
गज्या मारणेला वाईतून अटक
गुन्ह्यातील मुख्य आरोपी कुख्यात गुन्हेगार गज्या मारणे याला रविवारी (दि.16) सातारा जिल्ह्यातील वाई येथून खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare) आणि कर्मचार्यांनी ताब्यात घेतले. कुख्यात गजानन मारणे हा अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्या वाई येथील फार्म हाऊसवर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गेला होता. तेथून पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक-2 नं गज्या मारणेला ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे करीत आहेत.
गज्या मारणेला 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
गज्या मारणे आणि मयुर जगदाळे यांना आज विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील अॅड. विजय फरगडे (Advocate Adv. Vijay Fargade) यांनी न्यायालयात सांगितले, आरोपींनी फिर्यादी यांना वेगवेगळ्या वाहनांमधून फिरवून त्यांचे अपहरण केले आहे. तसेच आरोपी चौकशीत सहकार्य करत नसून गुन्ह्यात वापरलेल्या गाड्यांचा तपास पोलिसांना करायचा आहे. याशिवाय आरोपींनी कट रचून हा गुन्हा केला असून हा कट कोठे रचण्यात आला आणि त्यांचे आणखी कोण साथिदार आहेत याचा तपास करायचा आहे. गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असून त्यांना देखील अटक करायची आहे. त्यामुळे आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली. यावेळी आरोपी गज्या मारणे याच्या बाजूने अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपी गज्या मारणे व मयुर जगदाळे यांना 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajgane),
पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav),
श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके,
अनिल मेंगडे, सचिन गायकवाड, संग्राम शिनगार, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे,
चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, सुरेंद्र साबळे, विनोद शिवले, अकबर शेख पवन भोसले,
रवि सपकाळ व महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Web Title :- Pune Crime | 20-crore extortion case, killing of notorious gangster ‘Goyat’,
12 days in police custody
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | पुर्ववैमनस्यातून तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या त्रिकुटाला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक
- Chitra Wagh | चित्रा वाघ यांचे खासदार सुळेंना प्रत्युत्तर, म्हणाल्या – ‘भाजपाची काळजी सोडा सुप्रियाताई…, A for अमेठी, B for…’
- Jayant Patil | भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अन्यथा त्यांना…, जयंत पाटलांचा भाजपला टोला