Pune Crime | मित्रांच्या पार्टीत नशेत असलेल्या कॉलेज तरुणीवर बलात्कार, वारजे परिसरातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कॉलेज मित्रांसोबत पार्टीला गेलेल्या आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सात ते आठ मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या पार्टीनंतर ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी तिच्याच ग्रुप मधील एका 24 वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी अटक (Pune Crime) केली आहे.

 

मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन घरच्या घरी आयोजित केलेल्या पार्टीदरम्यान आरोपी स्वप्नील ठाणगे (वय-24 रा. दौंड) याने आपल्या 20 वर्षीय मैत्रिणीवर बलात्कार केला. याबाबत पीडित तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर येथे राहणाऱ्या एका मित्राच्या घरी सात ते आठ जणांनी शनिवारी (दि.26) पार्टीचे आयोजन केले होते.
या पार्टीत तरुणीने मद्यपान केले होते. मद्यापन केल्याने तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ती घराच्या गॅलरीमध्ये गेली.
तिच्या मागे आरोपी स्वप्निल देखील गॅलरीत गेला. त्याने देखील मद्यपान केले होते.
नशेच्या धुंदीत त्याने पहाटेच्या सुमारास तरुणीवर बलात्कार केला. याबाबत तरुणीने तिच्या मैत्रिणीला सांगितले.
त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली.
पोलिसांनी स्वप्निल ठाणगे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 20 year old women rape by friend at house party accused  arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kriti Sanon | प्रभासबरोबर अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत सोडले मौन

Shreyas Talpade | अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं मुलाखतीदरम्यान ‘या’ गोष्टीचा केला खुलासा

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर