Pune Crime | पुण्याच्या कल्याणीनगरमधील कॉल सेंटरमध्ये घुसून 22 वर्षाच्या तरूणीचा ‘विनयभंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कल्याणीनगर येथील एका कॉलसेंटरमध्ये (Call Center in Kalyani Nagar) शिरुन हे कॉल सेंटर फेक आहे. तुम्ही सगळे बाहेर व्हा. तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी देऊन कार्यालयातील कर्मचार्‍यांना मारहाण करुन तोडफोड (Pune Crime) करण्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच कंपनीमधील तरुणीचा विनयभंग (molestation case) करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police Station) तिघांना अटक केली आहे.

 

युवराज प्रमोद नायडु Yuvraj Pramod Naidu (वय २६, रा. राजवर्धन हाईटस, टिंगरेनगर), गणेश प्रकाश मोघे Ganesh Prakash Moghe (वय २७, रा. मंगळवार पेठ) आणि सिद्धांत सतिश लालबिगे Siddhant Satish Lalbige (वय २२, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता कल्याणीनगरमधील एका कॉलसेंटरमध्ये (Pune Crime) घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल सेंटरच्या दरवाजाचे लॉक तोडून तिघे जण कार्यालयात शिरले. तेथे असलेल्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन “हे कॉल सेंटर फेक असून तुम्ही सगळे बाहेर व्हा, नाही तर तुम्हाला बघुन घेऊ,” अशी धमकी दिली. कार्यालयामधील प्लायवुड, कॉम्प्युटर, झाडांच्या कुंड्या मारुन तोडफोड केली. तेथील कर्मचार्‍यांना हाताने मारहाण केली. युवराज नायडु याने तेथील एका तरुणीच्या पोटाला धरुन तू आतमध्ये चल असे म्हणून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन विनयभंग (Pune Crime) केला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक लिटे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 22 year old girl molested after entering call center in Kalyaninagar, Pune
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Accident News | दुर्देवी ! मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन परतताना जीप उलटून अपघात; पती-पत्नी जागीच ठार

Pune Crime | पुण्यातील नामांकित सराफांना गंडा, महिला CCTV मध्ये कैद; पोलिसांकडून अटक (व्हिडीओ)

New Ration Card | नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीच्या दाखल्याची गरज नाही, कागदपत्रांच्या नियमांत काही बदल; जाणून घ्या प्रक्रिया

Omicron Covid Variant | Delta पेक्षा किती वेगळा आहे Omicron? सर्वप्रथम अलर्ट करणार्‍या दक्षिण अफ्रीकन डॉक्टरने दिली माहिती

Facial Recognition Technology (FRT) | आता चेहरा दाखवताच तयार होईल Boarding Pass, मार्च 2022 पासून पुण्याच्या लोहगाव विमानतळासह 4 ठिकाणी सुरू होईल FRT System