Pune Crime | स्पीड ब्रेकरवर तोल जाऊन 22 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू, पुण्यातील बाणेर रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दुचाकीवरुन जात असताना अचानक स्पीड ब्रेकरवर (Speed Breakers In Pune) ब्रेक दाबल्याने तोल जाऊन पडून झालेल्या अपघातामध्ये (Pune Accident News) एका 22 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू (Young Man Dies) झाला आहे. हजरत अली इस्लाम शेख Hazrat Ali Islam Shaikh (वय-22 रा. पिंपळे निलख-Pimple Nilakh) असे या तरुणाचे (Pune Crime) नाव आहे.

या अपघाताची नोंद चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) करण्यात आली आहे. ही घटना बाणेर रोडवरील (Baner Road) कपिल मल्हार सोसायटीजवळ (Kapil Malhar Society) 3 मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना तो स्वत: पडून गंभीर जखमी (Seriously Injured) झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.(Pune Crime)

हजरत अली शेख हा दुचाकीवरुन दुपारी तीनच्या सुमारास जात होता. उन्हामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. कपिल मल्हार सोसायटीजवळ वेगाने जात असताना अचानक स्पीड ब्रेकर वर त्याने ब्रेक दाबला. त्यामुळे त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत (Head Injury) झाल्याने त्याला नागरिकांनी तातडीने ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू (Death) झाला.

Web Title : Pune Crime | 22 year old Hazrat Ali Islam Shaikh dies after speed breaker in baner road pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त