Pune Crime | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेमप्रकरण (Love Affair) घरच्यांना सांगण्यासाठी फोन करुन त्रास देऊन अल्पवयीन मुलीला धमकी (Threat) देणाऱ्या एकावर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी (Pune Police) ओंकार निलेश जगताप (Omkar Nilesh Jagtap) याच्यावर आयपीसी 354 (अ) (ड), 506, पोक्सो अ‍ॅक्ट (Pocso Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली (Pune Crime) आहे.

 

याबाबत हडपसर परिसरात राहणाऱ्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ओंकार निलेश जगताप (वय. 22 रा. हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते 27 एप्रिल 2022 या कालावधीत हडपसर मधील एका शाळेच्या परिसरात घडला आहे.(Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला फोन करुन लग्नासाठी (Marriage) आणि प्रेम प्रकरण घरच्यांना सांगण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर आरोपीने वारंवार फोन करुन तिला त्रास दिला. तसेच ‘तुझे आयुष्य उद्धवस्त करतो, तुझ्या घरी येतो’ अशी धमकी दिली. यानंतर आरोपीने पीडित तरुणीला वारंवार फोन केले. आरोपीकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून पीडितेने तिच्याबाबत घडलेला प्रकार काका आणि मावशीला सांगितला. त्यांनी पीडितेला घेऊन हडपसर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | 22 year old man arrested for molesting minor girl

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा