Pune Crime | लोहगाव परिसरात भाड्याची रुम दाखविण्याच्या बहाण्याने 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार; व्हिडिओ क्लिप तयार करुन दिली धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भाड्याने रुम दाखविण्याचा बहाणा (Lure Of Rented House) करुन व चांगली नोकरी लावतो (Lure Of Job), असे सांगून तरुणीला घरी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) संतोष संभाजी केंद्रे Santosh Sambhaji Kendre (वय ३०, रा. स्वामी समर्थनगर, लोहगाव – Lohegaon) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत एका २४ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात (गु. रजि. न. १४४/२२) फिर्याद दिली आहे. हा प्रकार २२ एप्रिल रोजी रात्री घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष याने फिर्यादी तरुणीला रुम भाड्याने देण्याचे व चांंगली नोकरी लावतो, असे आमिष दाखविले. त्यानुसार ही तरुणी त्याच्या घरी गेली. तेथे त्याने रुम दाखविल्यानंतर रात्री तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध (Physical Relation) करुन त्याची व्हिडिओ क्लिप (Video Clip) तयार केली. तू हे कोणाला सांगितले तर तुझी व्हिडिओ क्लिप व्हायरल करेन, अशी धमकी (Viral Video Clip) दिली. त्याच्या या धमकीला न जुमानता या तरुणीने पोलिसांकडे (Pune Police) धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंगे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 24-year-old girl raped in Lohegaon area under the
pretext of showing a rented house and room; Threatened to create a video clip

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा