Pune Crime | गुन्हे शाखेकडून 25 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नोबेल हॉस्पिटल जवळ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विक्रीसाठी नेला जात असलेला 25 लाख रुपयांचा गुटखा (Gutkha) व टाटा झेनॉन योद्धा (Tata Xenon Yodha) गाडी (एमएच 12 आर. एन. 6703) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell, Pune) जप्त केली. याप्रकरणी प्रकाश प्रेमाराम भाटी Prakash Premaram Bhati (वय – 33 रा. कात्रज कोंढवा रोड पुणे) याला अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई (Pune Crime) शनिवारी (दि.2) मुंढवा हडपसर रोडवरील (Mundhwa Hadapsar Road) नोबेल हॉस्पिटल जवळ करण्यात आली.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना मुंढवा हडपसर रोडवरुन एका टाटा झेनॉन योद्धा गाडीतून शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पान मसाला गुटख्याची विक्री करण्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नोबेल हॉस्पिटल (Noble Hospital) परिसरात सापळा रचून प्रकाश भाटी याच्यासह गाडी ताब्यात घेतली. गाडीची तपासणी केली असता प्रतिबंधीत गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा व इतर असा एकूण 25 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी भाटी विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
—
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगने (API Changdev Sajagane), पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan),
पोलीस अंमलदार चेतन शिरोळकर, प्रदिप शितोळे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंखे, अनिल मेंगडे, शैलेश सुर्वे,
विजय गुरव, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, प्रदिप गाडे, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, किशोर बर्गे, रवी सपकाळ,
महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime | 25 lakh banned gutka seized from pune police crime branch Action on hadapsar mundhwa road near nobel hospital
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update