Pune Crime | ‘मार्केटिंग’वाल्या 25 वर्षीय विवाहितेला पुणे स्टेशनजवळच्या लॉजवर नेलं, कोल्ड्रींकमधून गुंगीचं औषध देऊन ‘काम’ तमाम, व्हिडीओ अन् फोटो व्हायरलची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मार्केटींग करणाऱ्या एका 25 वर्षाच्या विवाहितेला ग्राहकाला भेटवतो असे सांगून लॉजवर नेले. त्याठिकाणी कोल्ड्रींक मधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime ) पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर 24 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी साडेतीन ते पाच या दरम्यान घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) एकाविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

धनंजय जाधव Dhananjay Jadhav (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथील 25 वर्षीय तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तपासी अधिकारी महिला सहायक पोलीस निरीक्षक सविता संकपाळ (API Savita Sankapal) यांनी सांगितले की, पीडित तरुणी ही एका प्रोडक्टचे मार्केटींग (Marketing of products) करते.
पीडित तरुणीने तिच्याकडे असलेले प्रोडक्ट फेसबुकवर पोस्ट केले होते. आरोपीने तरुणीचा फोन नंबर फेसबवुकवरुन घेतला.
त्यानंतर तिला फोन करुन तुमचे प्रोडक्ट माझे नातावाईक, बहिण यांना पाहिजे असल्याचे सांगून भेटायला बोलावले.

आरोपी धनंजय जाधव याने पीडित तरुणीला ग्राहकांना भेटवतो असे सांगून रिक्षातून पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर घेऊन गेला.
त्याठिकाणी तरुणीला कोल्ड्रींक बॉटलमधून (Cold drink bottle) गुंगीचे औषध (Pune Crime) पाजले.
तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.
तसेच घटनेचा व्हिडिओ आणि फोटो काढले. काही दिवसांनी हे फोटो आणि व्हिडिओ तरुणीला पाठवले.
आरोपीने तरुणीला आपल्या सोबत संबंध ठेवण्यास सांगितले.
याला नकार दिल्यानंतर आरोपीने तरुणीला शारिरीक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ आणि फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच पतीला व्हिडिओ दाखवण्याची धमकी दिली.

 

पीडीत तरुणीने तक्रार दिल्यानंतर या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. प्राथमिक तपासामध्ये आरोपी हा पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer)
असल्याची माहिती समोर येत असून त्या दृष्टीने तपास (Pune Crime) केला जात आहे.
आरोपीने लॉजवर रुम बुक करताना दिलेल्या आधार कार्डवरुन तो मुळचा सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.
पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक सविता संकपाळ (API Savita Sankpal) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | 25-year-old married woman with ‘marketing’ taken to lodge near Pune station, drugged with cold drink

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Cruise Drug Case | नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट ! म्हणाले – ‘भाजप नेत्याचा तो मेहुणा कोण?’

Pune News | सन्मान स्त्री शक्तीचा ! कर्तृत्ववान महिलांचा वडगावशेरी भाजपकडून सन्मान

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा राणेंवर पलटवार, म्हणाले – ‘सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, कोणी म्हणेल मीच बांधला’ (व्हिडीओ)