Pune Crime | 28 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत डॉक्टरला गंभीर मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खेड तालुक्यातील चांडोली फाटा (Chandoli Fata) येथे खाजगी रुग्णालयात 28 वर्षीय महिलेवर औषध उपचार सुरु असताना मृत्यू (Died) झाल्याची घटना (Pune Crime) उघडकीस आली आहे. डॉक्टरानी उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरला नातेवाईकांनी गंभीर मारहाण करत रुग्णालयाच्या काचाही फोडल्याची घटना (6 एप्रिल) रोजी दुपारी घडली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, खेड तालुक्यातील कडुस तुरुकवाडी (Kadus Turukwadi) येथील निलोफर शमसुद्दीन मोमीन (Nilofar Shamsuddin Momin) (वय 28) या विवाहित महिलेने घरगुती कारणावरून विष प्राशन केले होते. पुढील औषध उपचारासाठी चार दिवसापुर्वी चांडोली फाटा येथील जीवनरक्षा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज (बुधवारी) दुपारच्या दरम्यान त्या महिलेचा उपचारादरम्यान मुत्यू झाला आहे. (Pune Crime)

 

रुग्ण दगावला कसा? अशी विचारणा करत संतप्त नातेवाईकांनी डॉ. रमेश शेजुळ (Dr. Ramesh Shejul) (रा. राक्षेवाडी, ता. खेड) यांच्या डोक्याला सॅनिटायझरच्या लोखंडी स्टँडने मारहाण केली आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या काचा फोडल्या, या मारहाणीत डॉ. शेजुळ गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी चाकण येथे दाखल केले गेले.

दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलिस निरिक्षक सतीश गुरव (Police Inspector Satish Gurav),
पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले (PSI Bharat Bhosle), पोलिस हवालदार संतोष घोलप (Police Constable Santosh Gholap),
संदिप भापकर (Sandeep Bhapkar), नवनाथ थिटे (Navnath Thitte) यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी जमलेल्या जमाव व नातेवाईकांना शांत केले.
याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात (Khed Police Station) दोन्ही बाजुने गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Web Title :- Pune Crime | 28 year old woman dies during treatment doctor severely beaten khed pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | रेल्वे कर्मचार्‍यांना ‘या’ महिन्यात मिळेल मोठी रक्कम, 14 लाख लोकांना मिळेल थेट लाभ

 

Sharad Pawar On Maharashtra Home Department | राष्ट्रवादी आपलं गृहखातं शिवसेनेला देणार ?; शरद पवारांनी जरा स्पष्टच सांगितलं…

 

Vaani Kapoor Hot Photo | वाणी कपूरनं फ्लॉन्ट केला बोल्ड अवतार, काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये सोशल मीडियावर केला कहर