Pune Crime | हॉटेल मॅनेजरच्या दक्षतेमुळे 3 अल्पवयीन मुली सुरक्षित; नोकरीच्या शोधात दिल्लीतून आल्या होत्या पुण्यात पळून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नोकरीच्या शोधासाठी १६ – १७ वर्षाच्या तीन अल्पवयीन मुली (Minor Girls) दिल्लीतून (Delhi) रेल्वेने थेट पुण्यात आल्या. मंगळवारी रात्री त्या एका हॉटेलमध्ये रुम मिळविण्यासाठी आल्या. सुदैवाने तेथील मॅनेजरने ही माहिती पोलिसांना (Pune Police) दिली. पोलिसांनी दिल्लीतील त्यांच्या नातेवाईकांना त्यांची माहिती देण्यात आली आहे. (Pune Crime)

 

राजधानी हॉटेलचे (Rajdhani Hotel) मॅनेजर सुधाकर कमलाकर डांगे (Sudhakar Kamlakar Dange) असे त्यांचे नाव आहे. (Pune Crime)

याबाबत समर्थ पोलीस ठाण्याचे (Samarth Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे (Senior Police Inspector Ramesh Sathe) यांनी माहिती दिली. नोएडा (Noida) येथील १३, १६ व १७ वर्षाच्या तीन मुली दिल्लीहून रेल्वेने बुधवारी रात्री सव्वानऊ वाजता पुण्यात पोहचल्या. तेथून त्या राजधानी हॉटेलमध्ये आल्या. सुधाकर डांगे यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना कळविले की, तीन अल्पवयीन मुली हॉटेलमध्ये आल्या असून रुम मागत आहेत. त्यांच्याबरोबर कोणीही वयस्कर व्यक्ती नाही. हे समजल्यावर समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रणदिवे (Police Sub-Inspector Randive) महिला अंमलदारांसह हॉटेलवर पोहचले. त्यांनी या मुलींकडे चौकशी केल्यावर त्यांनी घरात काहीही न सांगता नोकरीच्या शोधात पुण्यात आल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा नोएडा सेक्टर २० पोलीस ठाण्यात त्यांची हरविल्याची तक्रार करण्यात आल्याचे दिसून आले. मुलींच्या नातेवाईकांशी संपर्क करुन मुली पुण्यात सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली. त्यांना सध्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. हॉटेल मॅनेजरच्या दक्षतेमुळे हा प्रकार समोर आल्याने या मुली सुखरुप राहू शकल्या.

 

 

Web Title :- Pune Crime | 3 minor girls safe due to vigilance of hotel manager She had come from Delhi in search of a job and fled to Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा