Pune Crime | पुण्यात नर्सच्या वेशातील महिलेनं पळविले 3 महिन्याच्या मुलीला ! ससून हॉस्पीटलमधील घटनेने खळबळ

पुणे : Pune Crime | पुणे स्टेशनसमोर फुटपाथला झोपलेल्या ६ वर्षाच्या मुलीला पळवून नेणार्‍या तिच्यावर अत्याचार करणार्‍या रिक्षाचालकाला रात्रीत पकडल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी (Bundgardan Police) अशीच एक कामगिरी केली आहे. ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचारासाठी आलेल्या महिलेकडील एका ३ महिन्याच्या मुलीला परिचारिकेचा गणवेश घालणाऱ्या महिलेने पळवून नेले होते. तिचाही मार्ग काढत खराडी रोडपर्यंत पाठलाग करुन पकडण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे. या महिलेला अटक करुन मुलीची सुखरुप सुटका करण्यात (Pune Crime) आली आहे.

वंदना मल्हारी जेठे (वय २४, रा. थिटे वस्ती, खराडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कासेवाडी येथे राहणार्‍या एका २२ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या ३ महिन्याच्या मुलीला घेऊन गुरुवारी ससून रुग्णालयात आल्या होत्या. ससूनमधील वॉर्ड क्रमांक ७४ मध्ये त्या थांबल्या होत्या. यावेळी एक परिचारिकेसारखा गणवेश घातलेली महिला तिच्याकडे आली. तिने या फिर्यादी महिलेला तुमच्या नातेवाईकांनी बोलावले आहे, असे सांगितले.

Maharashtra Police Transfer | पुण्यातील पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, मितेश घट्टे, स्वप्ना गोरे यांची बदली; पुणे ग्रामीणचे विवेक पाटील पुणे शहरात

तुम्ही जा मी बाळाला सांभाळते, असे सांगितले. ती परिचारिका असल्याचे समजून या महिलेला आपल्या ३
महिन्यांच्या मुलीला तिच्याकडे दिले. त्या नातेवाईकांना पहायला गेल्या.
तेथून परत आल्या तर ती परिचारिका व तिची मुलगी जागेवर नसल्याचे आढळून आली. या महिलेने तातडीने ससून रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना ही बाब सांगितली.
त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी केली.
तेव्हा परिचारिकेचा गणवेश घातलेली एक महिला रिक्षात बसत असल्याचे आढळून आले.
त्यांनी तातडीने रिक्षाचा शोध सुरु केला. तेव्हा ही रिक्षा नगर रोडवर असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी खराडी रोडला या रिक्षाचा पाठलाग करुन तिला पकडले व मुलीची सुखरुप सुटका केली.

हे देखील वाचा

Pune Police Transfer | पुण्यातील ACP मच्छिंद्र चव्हाण, सुधाकर यादव, SDPO सई भोरे यांच्यासह 17 अधिकार्‍यांच्या बदल्या; ACP नारायण शिरगांवकर, विजयकुमार पळसुले, आरती बनसोडे यांची पुणे शहरात बदली

Pune Crime | पत्नीला वेडी ठरवून नेले भोंदुबाबाकडे, त्याने उपचाराच्या बहाण्याने केले अश्लिल चाळे

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | 3 month old girl abducted by nurse in Pune Excitement over the incident at Sassoon Hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update