Pune Crime | हवाला एजंटशी संगनमत करुन व्यापार्‍याकडील 5 कोटीतील 45 लाख लुटणाऱ्या पुण्याच्या दत्तवाडी ठाण्यातील 3 पोलिसांना अटक; ‘वर्दी’वर असताना भिवंडीत जाऊन केली ‘लुट’, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम  Pune Crime | पुण्यातील हवाला एजंटशी (Hawala Agent In Pune) संगनमत करुन नाशिक (Nashik) येथून मुंबईला (Mumbai) हवालाची ५ कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाणार्‍या मोटारीला भिवंडीजवळ (Bhiwandi) अडवून दत्तवाडी पोलीस ठाण्यातील (Dattawadi Police Station) तिघा पोलिसांनी ४५ लाख रुपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे (Pune Crime). याप्रकरणात नारपोली पोलिसांनी (Narpoli Police) पुण्यातील एका हवाला एजंटला पकडल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे.

नारपोली पोलिसांनी या तीन पोलिसांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन पाटील (Assistant Police Inspector Chetan Patil) यांनी दिली आहे. गणेश बाळासाहेब शिंदे Ganesh Balasaheb Shinde (वय ३५, रा. वानेवाडी, बारामती – Wanewadi, Baramati), गणेश मारुती कांबळे Ganesh Maruti Kamble (वय ३४, रा. डाळींब, ता. दौंड – Daund) आणि दिलीप मारोती पिलाने Dilip Maroti Pilane (वय ३२, रा. महमंदवाडी) अशी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत. आता त्यांना अटक करण्यात आली आहे. बाबूभाई राजाराम सोलंकी Babubhai Rajaram Solanki (वय ४७, रा. बालाजीनगर,पुणे – Balajinagar) असे अटक केलेल्या हवाला एजंटचे नाव आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका ५९ वर्षीय व्यापाऱ्याने नारपोली पोलीस ठाण्यात (Narpoli Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना नाशिक -मुंबई महामार्गावरील (Nashik-Mumbai Highway) भिवंडी येथील हायवे दिवे गावातील (Dive gaon) इंडियन ऑयल पेट्रोल पंपासमोर (Indian Oil Petrol Pump) समोर ८ मार्च रोजी सकाळी पावणे सात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा स्टिलचा व्यवसाय आहे तर सोलंकी हा त्यांचा मेव्हणा आहे. सोलंकी आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सोलंकी हा हवाला एजंट म्हणून काम करतो. फिर्यादी हे हवालाचे पैसे घेऊन मुंबईला जाणार असल्याची माहिती सोलंकी याला होती. त्याने ही बाब तिघा पोलिसांना सांगितली. चौघांनी मिळून फिर्यादीला लुटण्याचा कट रचला. चौघेही जण भिवंडीला गेले. तेथे ते इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ दबा धरुन बसले होते.

सोलंकीने फिर्यादीची मोटार आल्याचा इशारा केल्यावर तिघांनी मोटार अडविली. त्यांना बाजूला घेतले. आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गाडीत मोठी रोकड आहे, तपास करायचा आहे, अशी बतावणी करुन ५ कोटी रुपयांच्या रोकडमधील ४५ लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर तेथून या तिघांनी पळ काढला.

फिर्यादी हे पुढे मुंबईला गेले. त्यांनी संबधितांना पैसे दिले.
नाशिकमधील ज्या उद्योजकाचे पैसे होते, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी १० मार्च रोजी नारपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सहायक पोलीस निरीक्षक चेतन पाटील (API Chetan Patil) यांनी केलेल्या तांत्रिक तपासात घटनेच्या ठिकाणी सोलंकी याचा मोबाईल सक्रीय असल्याचे आढळून आले.
त्यानंतर त्यांनी सोलंकी याला पुण्यातून ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीत या तिघा पोलिसांचे हे कृत्य उघडकीस आले.
त्यानंतर या तिघांचा शोध घेऊन आज (रविवारी) सकाळी तिघांना ताब्यात घेण्यात आले आणि अटक करण्यात आली.

‘वर्दी’वर असताना केला गुन्हा

या तिघांची ७ मार्चला साप्ताहिक सुट्टी होती. ते त्यादिवशी रात्री ११ वाजता पुण्याहून निघाले. पहाटे ४ वाजता भिवंडीत पोहचले.
तेथे सकाळी ८ वाजेपर्यंत दबा धरुन बसले.
त्यानंतर त्यांनी परमार यांना अडवून ४५ लाख रुपये लुटले. चौघांनीही प्रत्येकी ९ लाख रुपये वाटून घेतले.
त्यानंतर ते पुन्हा तातडीने पुण्यात आले.
तिघे जण काही घडलेच नाही, असे दाखवून ८ मार्च रोजी ड्युटीवर हजर झाले. ९ मार्च रोजीही ते कामावर होते.
१० मार्च रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते तिघे फरार झाले होते.
पण नारपोली पोलिसांनी तिघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.

Web Title :- Pune Crime | 3 policemen from Pune’s Dattawadi police station arrested for looting
Rs 45 lakh from a trader by colluding with a hawala agent

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Paracetamol Usage | अल्कोहोल घेतल्यानंतर घेत असाल पॅरासिटामॉलची गोळी तर व्हा सावध !
‘या’ अवयवाचे होऊ शकते सर्वात जास्त नुकसान

 

Nushrratt Bharuccha Monokini Photo | स्विमिंग पूलजवळ नुसरत भरूचानं दाखवला बोल्ड अंदाज,
मोनोकिना घालून सोशल मीडियावर केला कहर…

 

Rupali Thombare Patil | शरद पवारांवरील टीकेनंतर रूपाली पाटील यांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार;
बिरोबाला घातलं ‘हे’ साकडं !