क्राईम स्टोरीताज्या बातम्यापुणे

Pune Crime | हुंड्याच्या व भिक मागण्याच्या उद्देशाने 3 वर्षाच्या मुलीचे अपहरण, सराईत महिला आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फुटपाथवर फुगे विकणाऱ्या महिलेच्या तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण (Kidnapping) करणाऱ्या सराईत महिला गुन्हेगाराला कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. उषा नामदेव चव्हाण Usha Namdev Chavan (वय-40) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी (Pune Police) अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) श्रीगोंदा येथील कापसे वस्ती येथून महिलेला अटक केली. तिच्याकडून अपहरण केलेल्या तीन वर्षाच्या मुलीची सुखरुप सुटका केली. ही घटना (Pune Crime) 23 मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास ढोले पाटील रोडवर (Dhole Patil Road) घडली होती.

 

याबाबत मयुरी विनोद गायकवाड Mayuri Vinod Gaikwad (वय-23 रा. ढोले पाटील रोड, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा फुगे विकण्याचा व्यवसाय असून घटनेच्या दिवशी दुपारी दीडच्या सुमारास त्या रिक्षात झोपल्या होत्या. त्यावेळी त्यांची दोन लहान मुले रस्त्याच्या कडेला खेळत होती. तीनच्या सुमारास त्यांना जाग आली असता त्यांची तीन वर्षाची मुलगी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली.(Pune Crime)

दाखल गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी घटनास्थळावरील तसेच मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एक महिला अपहरण केलेल्या मुलीला घेऊन जाताना दिसली. त्यानुसार पोलिसांनी ढोले पाटील रोड, पाटील इस्टेट (Patil Estate), पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station), मालधक्का (Maldhakka), पुणे एसटी स्टँड (Pune ST Stand) परिसरातील फुटेजची पाहणी केली. दरम्याने सहायक पोलीस निरक्षक प्रेरणा कुलकर्णी (API Prerna Kulkarni) यांना महिले बाबत माहिती मिळाली. ही महिला पारधी समाजातील (Pardhi Community) असून अहमदनगर परिसरात राहते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक नगर येथे पाठवण्यात आले. पथकाने तपास करुन संबंधित महिला आरोपी आणि अपहरण झालेल्या मुलीला श्रीगोंदा येथील कापसे वस्ती येथून ताब्यात घेतले.

 

म्हणून केले मुलीचे अपहरण

आरोपी महिलेला दोन मुले आणि दोन मुली आहेत. तिच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लग्नामध्ये तिने तीस हजार रुपये हुंडा घेतला आहे. पारधी समाजामध्ये मुलीचे लग्न करताना मुलाच्या वडिलांकडून हुंडा घेण्याची प्रथा आहे. यामुळे आरोपी महिलेने लहान मुलीला पळवून नेवून तिला भिक्षा मागण्यास लावणे तसेच तिचे लग्न करताना हुंडा घेण्यासाठी मुलीचे अपहरण केल्याचे समोर आले आहे.

 

आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक पोलीस आयुक्त एन. ए. राजे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक वेताळ (Police Inspector Vinayak Vetal),
पोलीस निरीक्षक गुन्हे दिपाली भुजबळ (Police Inspector Deepali Bhujbal), सहायक पोलीस निरीक्षक प्रेरणा कुलकर्णी,
पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके (PSI Amol Ghodke) तपास पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे,
नामदेव खिलारे, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बालाजी घोडके, संदीप जढर, विशाल गाडे,
अझरुद्दीन पठाण, महिला पोलीस शिपाई ज्योती राऊत यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | 3 year old girl abducted for dowry and begging, woman accused arrested by Koregaon Park police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button