Pune Crime | मेव्हण्याच्या घरातील फ्रीजखाली लपवले 30 लाखांचे दागिने, आरोपींना बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बिबवेवाडी परिसरातील एका व्यावसायिकाच्या घरातून तब्बल 30 लाख रुपयांच्या 60 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी (Gold Jewelry Stolen) करणाऱ्या मुख्य आरोपीकडे तपास करून बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police) आणखी दोघांना (Pune Crime) अटक केली. आरोपीने मेव्हण्याच्या घरातील फ्रिज खाली लपविलेले 60 तोळ्यांचे दागिने जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

जुनेद रिझवान सैफ Junaid Rizwan Saif (वय – 29 रा. ग्रीन पार्क, शेरखान चाळ, कोंढवा), हैदर कल्लु शेख Haider Kallu Sheikh (वय – 31 रा. वसवाडी, पाखर सांगवी, बार्शी रोड, लातूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. यापूर्वी मुख्य आरोपी मुश्तफा उर्फ बोना उर्फ पाटी शकिल अन्सारी Mustafa alias Bona alias Pati Shakil Ansari (वय – 34 रा. ग्रीन पार्क शेजारी, कोंढवा) याला गुन्हे शाखा युनिट एकच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक (Arrest) केली आहे. अन्सारी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरात खडक (Khadak Police Station), वानवडी (Wanwadi Police Station), कोंढवा (Kondhwa Police Station), मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard Police Station) तसेच हैदराबाद येथील विजयवाडा पोलीस ठाण्यात (Vijayawada Police Station) दिवसा घरफोडी केल्याचे 18 गुन्हे दाखल आहेत. (Pune Crime)

 

ही घटना 20 जून रोजी घडली होती. याबाबत प्रविण रमेश कांडपीळ Pravin Ramesh Kandpil (रा. सोवासवेरा अपार्टमेंट, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.

 

याप्रकरणी अन्सारी याच्याकडे सखोल तपास करत असताना त्याने नातेवाईकांकडे हे दागिने लपवल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर अन्सारीच्या कोंढवा येथे राहणाऱ्या त्याच्या बहिणीच्या पतीकडे सखोल चौकशी केली असता जुनेद याने त्याच्या घरातील फ्रिजखाली दागिने लपवल्याची माहिती दिली. पोलिसांनी चोरीला गेलेले 30 लाख रुपये किमतीचे 60 तोळे वजनाचे दागिने जप्त केले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (Senior Police Inspector Vilas Sonde),
पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar)
यांच्या सुचनेनुसार, तपास पथकाचे (investigation Team) सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे (API Pravin Kalukhe),
पोलीस अंमलदार संतोष जाधव, सतिश मोरे, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, शिवाजी येवले, तानाजी सागर व राहुल शेलार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :-  Pune Crime | 30 lakh jewelery hidden under relative house accused arrested by Bibvewadi police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा