Homeक्राईम स्टोरीPune Crime | हडपसरमध्ये 30 वर्षीय महिलेवर बलात्कार, गर्भवती करुन लग्नास नकार

Pune Crime | हडपसरमध्ये 30 वर्षीय महिलेवर बलात्कार, गर्भवती करुन लग्नास नकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुलाचा वडिलांप्रमाणे सांभाळ करेल, असे वचन देऊन महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारिरीक संबंध (Physical Relation) ठेवले. त्यातून ती गर्भवती (Pregnant) राहिल्यावर तुझा गर्भ पाडून टाक, असे सांगून लग्नास नकार देऊन फसवणुक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुधीर अर्जुन बंकपल्ली Sudhir Arjun Bankapalli (वय ३५, रा. अ‍ॅमेनोरा पार्क, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१९ पासून ५ जानेवारी २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे अ‍ॅमेनोरा पार्क या मोठ्या सोसायटीत राहतात. सुधीर बंकपल्ली याने फिर्यादीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखविले. तिच्या मुलाचा वडिलाप्रमाणे सांभाळ करेल, असे वचन देऊन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिला फिरायला घेऊन जाऊन तिच्याबरोबर शारिरीक संबंध (Rape in Pune) केले. यातून फिर्यादी या गर्भवती राहिल्या. याची माहिती तिने सुधीर व त्याच्या आईवडिलांना सांगितली. तेव्हा त्यांनी फिर्यादीला तू तुझा गर्भ पाडुन टाक. तो तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तू जर तसे केले नाही तर तुला व तुझ्या मुलाला आम्ही जीवे मारुन टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरून शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक खळदे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 30 year old woman raped in Hadapsar refused to marry after getting pregnant

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News