Pune Crime | पुण्याच्या कात्रज घाटात प्रेम संबंधातून 32 वर्षीय महिलेचा चाकुने सपासप वार करून खून, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात प्रेम संबंधातून (love affair) एका 32 वर्षीय महिलेचा चाकुने सपासप वार करून खून (Murder) झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharti vidyapeeth police) चाकुने वार करून खून (Pune Crime) करणार्‍याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कात्रजच्या (Katraj) नवीन घाटाच्या सुरूवातीला असलेल्या कोळेवाडी येथे घडली.

सपना दिलीप पाटील (32) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidhyapeeth Police) राम गिरी नावाच्या तरूणाला अटक केली आहे. प्रेम संबंधातून धारदार चाकुने वार करून सपना पाटील यांचा खून (Pune Crime) करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी तसेच इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे.

राम गिरीने प्रेम संबंधातून सपना पाटील यांचा खून केल्याची माहिती समोर येत आहे. सध्यातरी पोलिसांनी राम गिरीला अटक केली आहे. सपना पाटील आणि राम गिरी यांच्यात नेमकं काय झालं त्यामुळे राम गिरीने हे पाऊल उचलले याबाबत पोलिस माहिती घेत आहेत. दरम्यान, 32 वर्षीय महिलेचा कात्रज घाटाच्या सुरूवातीला असलेल्या कोळेवाडी येथे खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हयाचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.

Web Titel :- Pune Crime | 32 year old woman stabbed to death in Pune’s Katraj Ghat due to love affair

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत घसरणीने खरेदीदार खुश ! आता 27501 रुपयात मिळतंय 10 ग्रॅम Gold, जाणून घ्या नवीन दर

T20-ODI Captaincy | T20 विश्वचषकानंतर विराट कोहली सोडणार कर्णधारपद, रोहित शर्मा सांभाळणार भारतीय संघाची सूत्रे – रिपोर्ट

High Security Number Plate | कामाची गोष्ट ! तुमच्या वाहनावर नसेल ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’, तर ‘या’ 11 कामांमध्ये येईल अडथळा; जाणून घ्या