Pune Crime | बारामतीमध्ये 34 वर्षीय ऑडिट सुपरवायझरची आत्महत्या

पुणे / बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  पंढरपूरला मुळ गावी निघालोय संध्याकाळी परत येतो म्हणून घरी फोनवर सांगून सकाळी निघालेल्या एका 34 वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची (committed suicide) घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) घडली आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) बारामती तालुक्यातील (Baramati taluka) पाहुणेवाडी येथे ही घटना घडली असून युवकाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेून आत्महत्या केली, अशी महाती सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे (API Rahul Ghuge) यांनी दिली. ही घटना शनिवारी (दि.9) पाहुणेवाडी गावच्या हद्दीत इरीकेशन 22 फाटा येथील कॅनॉलच्या कडेला घडली.

समाधान पांडुरंग पवार Samadhan Pandurang Pawar (वय-34 रा. जामदार रोड, बारामती, मुळ रा. धोडेवाडी, जैनवाडी, ता. पंढरपूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. याबाबत ज्योतीराम ज्ञानोबा पवार (वय-26 रा. बारामती, मुळ रा. धोडेवाडी, जैनवाडी ता.पंढरपूर) यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनला (Baramati Taluka Police Station) खबर दिली आहे.

मयत समाधान पवार हे बारामती येथील एका शॉपमध्ये ऑडिट सुपरवायझर (Audit Supervisor) म्हणून नोकरी करत होते.
शनिवारी पवार यांना त्यांचे चुलत भाऊ ज्योतीराम पवार व पत्नी रुपाली यांनी फोन केला असता आपल्या मुळगावी धोडेवाडी येथे निघालो असून संध्याकाळी परत येतो असे सांगितले.
यानंतर ते उशिरापर्यंत घरी पतले नसल्याने पत्नीने दिर ज्योतीराम यांना याची माहिती दिली.
त्यांनी मुळगावी फोन केला परंतु समाधान गावी आला नसल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी समाधानचा शोध घेण्यास सुरुवात करुन बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) मिसींग तक्रार दिली.

रविवारी समाधान पवार यांचा शोध घेत असताना दुपारी दीडच्या सुमारास समाधानला फोन करत असताना फिर्यादीचा चुलत भाऊ अमोल पवार यांच्या फोनवरुन समाधान पवार यांना फोन लागला.
त्यावेळी फोनवर पोलीस बोलत होते. पोलिसांनी नातेवाईकांना सर्व हकीकत सांगून ओळख पटवण्यासाठी बोलावून घेतले.

 

माळेगाव पोलिसांमुळे नातेवाईकांचा शोध

समाधान पवार यांनी आत्महत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी काही नागरिकांनी माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे (API Rahul Ghuge) यांना घटनेची माहिती (Pune Crime) दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, समाधान जवळ असलेला मोबाईल बंद असल्याने आणि त्याच्याजवळ ओळखपत्र नसल्याने ओळख पटत नव्हती.
अखेर राहुल घुगे यांनी समाधानच्या मोबाईलमधील सीम कार्ड आपल्या फोनमध्ये टाकले.

त्यानंतर समाधानच्या नातेवाईकांचा सतत फोन येऊ लागला. राहुल घुगे यांनी फोन बाबात चौकशी केली असता हा फोन समाधान पवार यांचा असल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर त्यांनी घडलेली सर्व हकीकत नातेवाईकांना सांगून ओळख पटवण्यासाठी बोलावून घेतले.
यानंतर मृतदेह रुई ग्रामीण रुग्णालयात (Rui Rural Hospital) नेऊन तपासणी नंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

 

Web Title : Pune Crime | 34-year-old audit supervisor commits suicide in Baramati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Band | आघाडीचा बंद हा ‘ढोंगीपणाचा कळस’, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात (व्हिडिओ)

Nusrat Jahan Marriage | …अन् नुसरत जहॉंनं दिली प्रेमाची कबूली ! फोटो शेअर करत म्हणाली, झालं दुसरं लग्न..

Ratan Tata Love Story | बिझनेसमध्ये यशस्वी ठरलेल्या रतन टाटा यांनी का केला नाही विवाह, कसे तुटले होते प्रेयसीसोबतचे नाते? जाणून घ्या