Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील 36 वर्षीय विवाहित महिला डॉक्टरसोबत तरुणाचं विकृत कृत्य; नग्न होण्यास भाग पाडलं, अन्…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | गुजरात येथील एका युवकाने पुण्यातील एका विवाहित महिला डॉक्टरसोबत विकृत कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे. या तरुणाने 36 वर्षीय पीडित महिलेला व्हिडीओ कॉलवर न्युड (Nude) होण्यास भाग पाडलं. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल (Viral video) करुन पीडित महिलेच्या नवऱ्याला देखील अश्लील व्हिडीओ पाठवून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. प्रणव अरविंद पांचाळ (Pranav Arvind Panchal) असं आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेनं वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) फिर्याद (FIR) दिली आहे.

याबाबत माहिती अशी, आरोपी प्रणव पांचाळ (Pranav Arvind Panchal) हा गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील अटलादरा येथील रहिवासी आहे.
तर, पीडित महिला विवाहित असून ती एक डॉक्टर आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पीडितेची आरोपी प्रणव पांचाळ याच्याशी ओळख झाली होती.
आरोपीने पीडित महिलेचा विश्वास संपादन करत तिला लग्नाचं आमिष दाखवलं. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल करून तिला कपडे काढण्यास भाग पाडलं.
यानंतर नराधम आरोपीनं पीडित महिलेचा अश्लील व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये स्क्रिन रेकॉर्ड केला.
त्याचबरोबर त्यानं हा अश्लील व्हिडीओ पीडित महिलेच्या इमेल आयडीवर पाठवला.
तसेच तिच्या नवऱ्यालाही हा व्हिडीओ पाठवून बदनामी (Pune Crime) करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

दरम्यान, फिर्यादी डॉक्टर महिलेचं ६ महिन्यांपूर्वी लग्न झालं असून, 2 मार्च 2020 ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
दरम्यान, याव्यतिरिक्त नातेवाईकांना व्हिडीओ पाठवून बदनामी करण्याची धमकी आरोपीनं दिल्याचं पीडितेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
याप्रकरणी महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) फिर्याद दिली आहे.
आरोपी विरोधात गुन्हा दाखल असून याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | 36 yeards old female married doctor objectionable videos and photos viral on internet in pune wakad police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Rains | महाराष्ट्रात आगामी 2 दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, IMD चा इशारा

Mutual Fund SIP | जर तुम्हाला सतावत असेल निवृत्तीनंतरची चिंता, तर 15 वर्षात सुद्धा जमा करू शकता 5 कोटी रुपये

Diabetes | डायबिटीज रूग्णांनी कधीही करू नयेत ‘या’ 6 चूका, आरोग्य होईल बरबाद; जाणून घ्या