Pune Crime | परदेशात व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील व्यावसायिकाला 37 लाखांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | परदेशात सूर्यफुलाचे तेल विक्री करुन जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यावसायिकाची तब्बल 37 लाख रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन जणांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime) जून 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत घडला आहे.

जेसी सारा Jesse Sarah (पुर्ण नाव पत्ता माहित नाही), खुशबु दत्ता (Khushbu Dutta), फ्रॅक डेव्हीस (Frank Davis) यांच्यावर आयपीसी 419, 420, 34, आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिनेश तिलकचंद संचेती Dinesh Tilakchand Sancheti (वय-53 रा. सातारा रोड, पुणे) यांनी बुधवारी (दि.14) सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश संचेती यांची फेसबुकवरुन आरोपी जेसी सारा हिच्यासोबत
ओळख झाली. त्यानंतर जून ते ऑगस्ट या कालावधीत आरोपीने व्यावसायिकाशी वेळोवेळी संपर्क साधून इतर
आरोपी सोबत संगनमत करुन हायड्रॉलिक अ‍ॅसिड एक्स्ट्रॉक्ट ऑईल Hyaluronic Acid Extract Oil
(सूर्यफुलाचे तेल) फिर्यादी यांच्या कंपनीच्या वतीने भारतात खरेदी करुन ते परदेशात पाठवण्यास सांगितले. त्यासाठी खुशबू दत्ता हिच्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने एकूण 37 लाख रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी पैसे पाठवले. मात्र, त्यानंतर कोणत्याही मालाची डिलेव्हरी न देता त्यांची आर्थिक फसवणूक (Cheating Case) केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | 37 lakhs extorted from Pune businessman by luring him to do business abroad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parag Bedekar Passes Away | मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन

Taapsee Pannu | तापसी पन्नू झळकणार शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटात; 2023 मध्ये होणार प्रदर्शित

Vivek Oberoi | बॉलिवूडवर अभिनेता विवेक ओबेरॉयने केले मोठे विधान; “त्यांनी माझं करिअर उद्ध्वस्त…”