Pune Crime | पुण्यातील श्रेयस फायनान्स कन्सल्टन्सीकडून नागरिकांची 38 लाखांची फसवणूक, दोन जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गुंतवणूकदारांचा (Investors) विश्वास संपादन करुन श्रेयस फायनान्स कन्सलटन्सी कंपनीच्या (Shreyas Finance Consultancy Company) प्लॅनमध्ये अनेकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगून 37 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रेयस फायनान्स कन्सल्टन्सीच्या दोन भागीदारांवर (Partner) पुण्यातील (Pune Crime) अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) IPC 420, 406, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम Maharashtra Protection of Depositors’ Interests Act (MPID) कलम 3,4 अन्वये नाशिक कुशन कापगते (Nashik Cushions Kapgate) व आशा नाशिक कापगते (Asha Nashik Kapgate) यांच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी प्रदिपकुमार अनिलकुमार मुखर्जी Pradipkumar Anilkumar Mukherjee (वय – 52 रा. न्याती इस्टेट, मोहंमदवाडी, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी श्रेयस फायनान्सचे भागीदार नाशिक कुशन कापगते व आशा नाशिक कापगते (फ्लॉ. नं. 8, मधुमालीनी लेन नंबर 6, डहाणूकर कॉलनी कोथरुड, पुणे) यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.
हा प्रकार 7 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 ते 10 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान पुण्यातील एनडीए रोडवरील (NDA Road) ऑफिसमध्ये घडला आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरुन पोलिसांनी शुक्रवारी (दि.8) गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस फायनान्स कन्सल्टन्सी या फर्मचे भागीदार यांनी फिर्यादी व इतर लोकांचा विश्वास संपादन करुन कंपनीच्या प्लान मध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले.
आरोपी आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये ठरल्याप्रमाणे आरोपींनी गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही.
आरोपींनी फिर्यादी आणि इतर लोकांची 37 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक (Cheating) केली.
पुढील तपास अलंकार पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | 38 lakh fraud from Shreyas Finance Consultancy in Pune FIR against two persons

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा