Pune Crime | भरदिवसा घरात शिरुन चाकूच्या धाकाने 39 तोळे दागिन्यांची चोरी, पुण्यातील धक्कादायक घटना

आधार कार्ड देण्याच्या बहाण्याने घरात शिरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आधार कार्ड (Aadhar Card) देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी व्यावसायिकाच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने (Gold Jewellery) आणि घरातील रोख रक्कम (Cash) चोरून नेली. ही घटना पुण्यातील सोमवार पेठेत शनिवारी सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या (Pune Crime) या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी 39 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 21 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

 

याबाबत एका 53 वर्षाच्या व्यावसायिकाने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कपड्याचे दुकान आहे. ते सकाळी दुकानात गेले होते.
तर त्यांची मुलगी कॉलेजला गेली होती. घरी त्यांची पत्नी एकटीच होती. साडेअकराच्या सुमारास दोन व्यक्ती घरी आले.
त्यांनी आधार कार्ड देण्यासाठी आलो असल्याची माहिती व्यावसायिकाच्या पत्नीला दिली.
त्यांच्यावर विश्वास ठेऊन पत्नीने दार उघडले. दार उघडल्यानंतर चोरटे जबरदस्तीने घरात घुसले.
त्यांनी फिर्यादी यांच्या पत्नाली मारहाण करुन चाकू गळ्याला लावला. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
यानंतर बेडरुमधील कपाटात ठेवलेले 19 लाख 75 हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख दीड लाख रुपये घेऊन पळून गेले.
पत्नीने आरडा-ओरडा करण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांनी गळ्याला चाकू लावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीच्या पत्नीने याची माहिती त्यांना दिली. त्यांनी घरी येऊन पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गुन्हा दाखल केला आहे.
भरदिवसा घरात घुसून एवढी मोठी जबरी चोरी झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Pune Crime | 390 gm gold was stolen by breaking into a house in broad daylight, a shocking incident in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Amol Mitkari | ‘आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट कबुली

 

Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दुकानांना भीषण आग; तीन दुकाने आगीत भस्मसात

 

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…