Homeक्राईम स्टोरीPune Crime | 67 बँक अकाऊंट वापरत पुण्यातील महिलेला 4 कोटींचा गंडा;...

Pune Crime | 67 बँक अकाऊंट वापरत पुण्यातील महिलेला 4 कोटींचा गंडा; दिल्लीतून दोघांना अटक, 21 मोबाईल, हार्ड डिस्क, 5 नेट डोंगल, 3 पेन ड्राईव्ह, 4 लॅपटॉप, आणि 8 Sim Card जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सोशल मिडीयावर (Social Media) झालेल्या मैत्रीनंतर महागडे गिफ्ट पाठवले आहे. मात्र ते विमानतळावर पकडण्यात आले असून त्यांना सोडविण्यासाठी एका महिलेकडून 3 कोटी 98 लाख ७५ हजार 500 रुपये उकळण्यात आले आहे. हे पैसे मिळण्यासाठी नायजेरीयन टोळीने 67 बँक खात्यांचा वापर केल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.

याबाबत कोरेगाव पार्कमध्ये राहणाऱ्या 60 वर्षीय महिलेने सायबर पोलिसांत (Cyber Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार टोळीतील जँगो निकोलस Django Nicholas (वय 29), माँण्डे ओकेके mannde okke (वय 26, दोघेही रा. नवी दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यात आणखी एक जणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात होते.
त्यांना ट्रान्झिट रिमांडद्वारे पुण्यात हजर करण्यात आले आहे.
21 सप्टेंबर 2020 ते 21 एप्रिल 2021 दरम्यान हा प्रकार घडला.
आरोपींच्या घर झडती दरम्यान 21 मोबाईल, एक हार्ड डिस्क, 5 नेट डोंगल, 3 पेन ड्राईव्ह, 4 लॅपटॉप, आणि 8 सीम आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

गुन्ह्यातील रक्कम जप्त करायची असून जप्त करण्यात आले आहे.
आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्यांची पडताळणी करायची असून तांत्रिक विश्लेषण करायचे असल्याने आरोपींना 10 दिवस पोलिस कोठडी देण्यात यावी,
असा युक्तिवाद सरकारी वकील मैथिली काळवीट (Public Prosecutor Maithili Kalvit) यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सायबर पोलिस ठाण्याच्या (Cyber Police Station) पोलिस निरीक्षक संगीता माळी (Police Inspector Sangita Mali) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Titel :-  Pune Crime | 4 crore cheating of a woman in Pune using 67 bank accounts; Two arrested from Delhi, 21 mobiles, hard disk, 5 net dongles, 3 pen drives, 4 laptops and 8 Sim Cards seized

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News