Pune Crime | 4 एक्स-रे प्लेटस चोरणार्‍याला दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | एक्स-रे काढण्यासाठी आवश्यक असलेल्या 4 एक्स-रे प्लेटस (X-Ray Plates) चोरणार्‍याला न्यायालयाने दोन वर्षे साधा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा (Pune Crime) सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट (First Class Magistrate R. K. Bafna-bhalgat) यांनी हा निकाल दिला. Pune Crime | 4 X-ray plate thief sentenced to two years in prison

महम्मद अली इस्माईल शेख (वय ५९, मूळ रा. चेन्नई) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत डॉ. अनंत एकनाथ बागूल Dr. Anant Eknath Bagul (वय ५६) यांनी याबाबत फरासखाना पोलिस ठाण्यात (faraskhana police station) फिर्याद दिली होती.
१० ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या दरम्यान कसबा पेठेमधील युनिर्व्हसल रुग्णालयात ही चोरी झाली होती.
रुग्णालयातील एक्स-रे विभागामध्ये एक्स-रे काढण्यासाठी गरजेच्या असलेल्या ग्रे रंगाच्या वेगवेगळ्या आकाराच्या चार एक्स-रे प्लेट्स ठेवण्यात आल्या होत्या.
या चोरीला गेल्याची फिर्याद देण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून शेख याला अटक केली.
या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुरेख क्षीरसागर यांनी पाहिले.
पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उप-निरीक्षक लोखंडे यांनी काम पाहिले.
पोलीस हवालदार एस. एस. नाईक यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.
दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १ महिना साधा कारावास भोगावा लागेल, असे ही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title : Pune Crime | 4 X-ray plate thief sentenced to two years in prison

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime | कोथरूड परिसरात तडीपार गुंडानं तरूणावर वार करून 25 हजार लुटले, पोलिसांकडून अटक

Maharashtra Cabinet Expansion | आमदार प्रणिती शिंदे यांना मिळणार मंत्रिपद ?

Gold Price Today | आज 7921 रुपयांनी सोनं स्वस्त, स्वस्त सोनं खरेदीची उद्यापर्यंत संधी, जाणून घ्या आजचे बाजारभाव