Pune Crime | पुणे पोलिसांच्या सामुहिक प्रयत्नामुळं बाणेरमधून ‘गायब’ झालेला 4 वर्षाचा स्वर्णव उर्फ डुग्गू ‘मम्मी-पप्पा’ कुशीत ‘सुखरूप’, ‘त्या’ बाबींचा तपास सुरू

डॉ. सतीश चव्हाण यांचा अपहरण झालेला चिमुरडा सापडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बाणेर (Baner) येथील हाय स्ट्रीट (High Street) परिसरातून पायी जाणाऱ्या 4 वर्षांच्या मुलाचे अपहरण (Kidnapping in Pune) करण्यात आले होते. अपहराण झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून (Pune Police) त्याचा शोध घेतला जात होता. सोशल मीडियावरुन देखील मुलाच्या तपासाबाबत पोलिसांकडून आवाहन (Pune Crime) करण्यात आले होते. अखेर अपहरण झालेला मुलगा पुनावळे (Punavale) येथे सापडला असून तो सुखरुप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्वर्णव उर्फ डुग्गू सतिश चव्हाण Swarnav alias Duggu Satish Chavan (वय-4) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. स्वर्णव याचे एका अॅक्टिव्हा सारख्या दिसणाऱ्या गाडीवरुन अपहरण करण्यात आले होते. हा प्रकार बालेवाडी पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर मंगळवारी (दि.1) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडला होता. अखेर या मुलाची सुटका करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.स्वर्णव उर्फ डुग्गूचे वडिल सतिश चव्हाण हे डॉक्टर आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-1) गजानन टोणपे (ACP Gajanan Tonpe), चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे (senior police inspector rajkumar waghchaure), गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाचे (Anti Extortion Cell Pune) पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhre) यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मुलाच्या शोध मोहिमेसाठी दिवसरात्र एक केले होते. दरम्यान, अद्यापही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी अपहरण प्रकरणाच्या इतर बाबींवर लक्ष केंद्रीत करत असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title : Pune Crime | 4-year-old Swarnav alias Duggu, who went missing from
Baner due to collective efforts of Pune Police, case is under investigation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

 

Income Tax Saving Tips | आई-वडिलांची देखभाल करून सुद्धा वाचवू टॅक्स, जाणून घ्या काय आहे नियम