Pune Crime | पुणे-सासवड रोडवरून 40 किलो गांजा जप्त, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पुणे (Pune Crime) : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | डीआरआयने (directorate of revenue intelligence) कालच पुण्यात तबल पावणे चार कोटींचा गांजा पकडला असताना पुणे पोलिसांनी (Pune Police) आज पुणे-सासवड रस्त्यावरच (pune saswad road) 40 किलो गांजा पकडला आहे. तसेच गांजा विक्री करण्यास आलेल्या तरुणाला अटक केली आहे.

सचिन नरसिंग शिंदे (वय 33) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात डीआरआयच्या पथकाने दोन गाड्यात फळांच्या माध्यमातून गांजा तस्करी होत असल्याचे उघडकीस आणले. त्यात 1 हजार 879 किलो गांजा पकडला. त्यात पावणे चार कोटींचा बाजार भावानुसार किंमत आहे. हा गांजा पुण्या-मुंबईसह इतर शहरात जात असल्याचे समोर आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होत असताना पुणे पोलिसांना याची कशी माहिती मिळाली नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत वरिष्ठांनी गुन्हे शाखा आणि संबंधित स्थानिक पोलिसांना धारेवर धरले होते.

Pune Crime | 40 kg cannabis seized from Pune-Saswad road, action of anti-narcotics squad of crime branch

यानंतर आजच अमली पदार्थ विरोधी पथकाने दणक्यात कारवाई केली आहे. हडपसर येथे सकाळी गस्त घालत असताना पोलीस हवालदार मनोज साळुंखे यांना वॅगनार कारमधून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज सातववाडी बसस्टॉप येथे हा गांजा पकडला आहे. 40 किलो 511 ग्रॅम गांजा सापडला. पोलिसांनी या गांजासहित वॅगनार कार, रोख 40 हजार रुपये, एक मोबाईल फोन असा एकूण 13 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने हा गांजा रामलिंग रोड शिरूर (Shirur) येथून एका
महिलेकडून विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
(pune police commissioner amitabh gupta) यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त
अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale), उपायुक्त श्रीनिवास
घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge), अमली पदार्थ विरोधी पथकाचे
पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad), पोलीस कर्मचारी
प्रवीण शिर्के, राहुल जोशी, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, नितीन जाधव यांच्या
पथकाने केली.

हे देखील वाचा

Pimpri Corona : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 243 नवीन रुग्ण, 229 रुग्णांना डिस्चार्ज

Ajit Pawar | सचिन वाझेच्या पत्रात पवारांचा उल्लेख, अजित पवारांची चौकशी करावी; हायकोर्टात याचिका दाखल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | 40 kg cannabis seized from Pune-Saswad road, action of anti-narcotics squad of crime branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update