क्राईम स्टोरीताज्या बातम्यापुणे

Pune Crime | एक्सर्बिया डेव्हलपर्सकडून 45 लाखांची फसवणूक ! कंपनीचे संचालक विशाल नहार, राहूल नहार, सचिन पाटील, नितीन सैद यांच्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वर्कऑर्डर (Work order) प्रमाणे काम पूर्ण करुन देखील बिलाची रक्कम आणि रिटेन्शन मनी (Retention money) परत न करता एक्सर्बिया डेव्हलपर्स कंपनीकडून (Xrbia Developers Company) 45 लाख 92 हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या चार संचालकांविरुद्ध (Director) कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2015 ते 2016 या कालावधीत कोथरुड येथील बांदल कॉम्पलेक्स येथील फिर्यादी यांच्या कार्यालयात घडला आहे.

 

एक्सर्बिया डेव्हलपर्स कंपनीचे संचालक विशाल नहार (Vishal Nahar), राहूल नहार Rahul Nahar (दोघे रा. मार्केटयार्ड, पुणे- Market Yard, Pune), सचिन पाटील (Sachin Patil), नितीन सैद (Nitin Said) यांच्यावर फसवणूकीचा (Cheating) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीपाल सुनील धाडीवाल Shripal Sunil Dhadiwal (वय-34 रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड, पुणे) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Pune Crime) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कोथरुड येथे कार्यालय आहे. एक्सर्बिया डेव्हलपर्सच्या संचालकांनी कोथरुड येथील कार्यालयात जाऊन वरई (Varai), माडप (Madap), आंबी (Ambi) व ताडवाडी (Tadwadi) येथील प्रोजेक्टच्या कामाची वर्क ऑर्डर दिली. वर्कऑर्डरप्रमाणे काम झाल्यानंतर लगेच कामाची रक्कम दिली जाईल असे आश्वासन दिले. त्यानुसार फिर्यादी यांनी काम केले. केलेल्या कामाच्या देय बिलाची 11 लाख 96 हजार 048 रुपये आणि प्रोजेक्टचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण बिलाच्या रक्कमेतून रिटेन्शन मनी 33 लाख 96 हजार 188 रुपये असे एकूण 45 लाख 92 हजार 236 रुपये न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. तसेच ग्राहकांकडून प्रोजेक्टसाठी घेतलेल्या रक्कमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Police Inspector Mahendra Jagtap) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 45 lakh fraud from Xrbia developers! FIR against company directors Vishal Nahar, Rahul Nahar, Sachin Patil, Nitin Said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | बनावट कागदपत्रांच्या आधारे फायनान्स कंपनीला 2 कोटींचा गंडा, मॅनेजरवर FIR

अडचणीच्या काळात उपयोगी पडतो Emergency Fund, जाणून घ्या किती आणि कसा तयार करावा

Numerology | ‘या’ मूलांकाच्या मुली बनतात चांगली पत्नी, बदलू शकते पतीचे ‘नशीब’; जाणून घ्या

Pune Crime | …म्हणून पुण्यातील एका विवाहितेने खाल्ल्या ‘थायरॉईड’च्या तब्बल 50 गोळ्या

 

Back to top button