Pune Crime | 25 लाखांच्या लॉटरीसाठी गमावले 46 लाख ! सायबर चोरट्यांनी घातला तरुणाला गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन | Pune Crime | परदेशातून गिफ्ट पाठविले असून ते कस्टममध्ये अडकले आहे. लॉटरी लागली, असे सांगून त्याची रक्कम मिळविण्यासाठी वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी (Cyber) गेल्या काही वर्षात अनेकांना कोट्यवधींना गंडा (Pune Crime) घातला. असे असले तरी त्यांच्या या जाळ्यात अजूनही लोक अडकत आहे. २५ लाख रुपयांच्या लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी एकाने तब्बल ४६ लाख ३५ हजार २०० रुपये गमावले.

याप्रकरणी बिबवेवाडीमधील सुपर इंदिरानगर (Super Indiranagar, Bibvewadi) येथे राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनिल यादव, राहुल शर्मा, विनोद गुप्ता, विक्रम सिंग, पंकजकुमार, नितीन चौहान व इतरांवर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा (Bibvewadi Police Station) दाखल केला आहे. हा प्रकार २२ मे ते २० ऑगस्ट २१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने झाला आहे.

आरोपींनी फिर्यादी यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर संपर्क साधून फिर्यादी यांना तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असे सांगितले. ही लॉटरीची रक्कम मिळण्यासाठी वेगवेगळे शुल्क भरावे लागतील असे सांगून त्यांना वेगवेगळ्या बहाण्याने विविध बँकेच्या खात्यावर पाठविण्यास सांगितले. लॉटरीची रक्कम मिळविण्याच्या मोहापायी फिर्यादी (Pune Crime) सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत गेले व त्यांनी ते सांगतील, त्याप्रमाणे रक्कम भरत गेले. त्यांनी २५ लाख रुपयांच्या लॉटरीसाठी तब्बल ४६ लाख ३५ हजार २०० रुपये भरले तरीही त्यांना लॉटरीची रक्कम मिळाली नाही. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station, Pune) तक्रार दिली. प्राथमिक तपासानंतर आता हा गुन्हा बिबवेवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक झावरे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 46 lakh lost for 25 lakh lottery! Cyber ​​thieves rob young man, shocking incident in Pune Bibvewadi police station cyber police station pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Belly and Waist Fat | महिनाभरात एकाचवेळी कमी होईल पोट आणि कंबरेची चरबी, केवळ ‘हे’ 3 व्यायाम नियमित करा; जाणून घ्या

Japanese long lives | गोड पदार्थ आणि चपाती वर्ज्य, जाणून घ्या जपानी लोकांच्या दिर्घायुष्याची ‘ही’ 10 रहस्य

Pune Crime | ‘तू कोण अधिकारी आहे का?, माझ्या नादी लागलास तर जीवानिशी मारुन टाकीन’ ! पुणे मनपाच्या नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला ठेकेदाराची मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी