Pune Crime | पतीच्या व्यवसायातील 33 वर्षीय भागीदाराकडून 46 वर्षाच्या महिलेवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पतीच्या व्यवसायात भागीदार (Business Partner) असलेल्या एकाने महिलेला जीवे मारण्याची धमकी (Threat) देऊन बलात्कार (Rape in Pune) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) धायरी येथे 27 जानेवारी 2021 ते 3 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे.

 

याप्रकरणी धायरी येथील रायकर मळा (Raikar Mala Dhayari) येथे राहणाऱ्या 33 वर्षाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत 46 वर्षाच्या पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव (PSI Nitin Jadhav) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचा भाजी (Vegetable) खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. पतीच्या व्यवसायात आरोपी भागीदार आहे. यामुळे पीडित महिलेची आणि आरोपीची ओळख झाली. आरोपी पीडित महिलेला भाजी खरेदी करण्याच्या बाहाण्याने घेऊन जात होता. याच दरम्यान त्याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिचा विश्वास संपादन केला.

 

यानंतर आरोपीने महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन डोणजे (Donje), खडकवासला (Khadakwasla) येथील लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
तसेच याबाबत कोणाला सांगितले तर घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
आरोपीकडून होत असलेल्या अत्याचाराला वैतागून पीडित महिलेने मंगळवारी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फीर्याद दिली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 46-year-old woman raped by 33-year-old partner in her husband’s business

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा